Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : ’बापू जी’ला मलायका अरोरासोबत डान्स करताना पाहून जेठालाल लाजला अन्… (Video)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुडची ’मुन्नी’ म्हणजेच अभिनेत्री मलायका अरोराचा फॅन फॉलोइंग खुप मोठा आहे. सध्या मलायका टीव्ही शो ’इंडियाज बेस्ट डान्सर’मध्ये जज म्हणून दिसत आहे. मलायका कंटेस्टंटला जज करतेच, शिवाय अनेकदा स्वत:ही स्टेजवर डान्सचा आनंद घेते. या वीकेंडला पुन्हा एकदा मलायका धमाल करणार आहे. ’तारक मेहता का उल्टा चष्मा’ची टीम यावेळी मंचावर पोहचणार आहे, जेथे ’बापू जीं’ ना मलायका अरोरासोबत नाचताना पाहून जेठालाल लाजेने पाणी-पाणी झाला आणि आपले डोळे बंद करून घेतले.

https://www.instagram.com/p/CG7EHj7hZR5/?utm_source=ig_web_copy_link

या आठवड्यात इंडियाज बेस्ट डान्सरच्या मंचावर ’तारक मेहता का उल्टा चष्मा’ची टीम पोहचणार आहे. शोमध्ये फुल टू धमाल पहायला मिळणार आहे. शोसंबंधीत अनेक प्रोमो व्हिडिओ वायरल होत आहेत, ज्यामध्ये मलायका अरोरा ’बापू जीं’सोबत डान्स करताना दिसत आहे.

’बापू जीं’ना मलायका अरोरासोबत अनारकली डिस्को चलीवर थिरकताना पाहून, जेठालालने आपले डोळे बंद करून घेतले. व्हिडिओत तारक मेहता का उल्टा चष्माची टीम इंडियाज बेस्ट डान्सरच्या मंचावर खुप मस्ती करताना दिसत आहे. जेठालालसह शो च्या अन्य सदस्यांनी सुद्धा मलायका अरोरासोबत जोरदार डान्स केला आहे. त्यांचा हा व्हिडिओ इंडियाज बेस्ट डान्सरच्या फॅनपेजने शेयर केला आहे, जो आतापर्यंत 1 लाखापेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे.

तारक मेहता का उल्टा चष्माची संपूर्ण टीम प्रोड्यूसर असित मोदीसोबत पोहचणार आहे. येथे तारक मेहताशिवाय जेठालाल, डॉ. हाथी, पोपटलाल आणि बाबू जी सुद्धा मलायकासोबत डान्स करताना दिसणार आहेत.

You might also like