#Birthday SPL : ‘तारक मेहता’मधील ‘अंजली भाभी’नं केलंय गुजराती, तेलगू अन् बॉलिवूड सिनेमात काम

पोलीसनामा ऑनलाइन टीम – तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेतील अंजली भाभी म्हणजेच अ‍ॅक्ट्रेस नेहा मेहता हिचा आज (मंगळवार दि 9 जून 2020) वाढदिवस आहे. आज तिच्या वाढदिवशी आपण काही खास गोष्टी जाणून घेणार आहोत.

https://www.instagram.com/p/B_MxwLmJRCP/?utm_source=ig_web_copy_link

नेहाचा जन्म 9 जून 1978 रोजी झाला आहे. नेहा गुजरातची रहिवाशी आहे. तारक मेहतामुळं ती खूप फेमस झाली आहे. नेहानं ड्रामामध्ये डिप्लोमा आणि परफॉर्मिंग आर्ट्समध्ये मास्टर केलं आहे. तिचे वडिल फेमस लेखक आहेत. त्यांच्यामुळंच नेहानं अ‍ॅक्टींगला सुरुवात केली. नेहा एक उत्तम क्लासिकल डान्सर आहे. ती भरतनाट्यममध्ये माहिर आहे. ती खूप आधीपासून थिएटरशी जोडलेली आहे.

https://www.instagram.com/p/B-1Zh4cpg5A/

नेहानं अनेक वर्ष थिएटर केल्यानंतर सर्वात आधी टीव्ही शो डॉलरमध्ये सुनेचा रोल केला होता. यानंतर तिनं भाभी मध्ये काम केलं. नेहानं या मालिकेत एक वर्ष काम केलं. यानंतर तिनं सौ दादा सासु ना, रात होने को हे, देस में निकला होगा चांद अशा अनेक मालिकेत काम केलं.

https://www.instagram.com/p/B-G9t0spHDJ/

फक्त मालिकाचं नाही तर नेहानं गुजराती सिनेमातही काम केलं आहे. 2003 मध्ये तिनं धाम या तेलगू सिनेमातही काम केलं आहे. संजय दत्त स्टारर EMI या सिनेमातही नेहा दिसली आहे.

https://www.instagram.com/p/B-EWJY_pa4z/

2008 साली नेहानं अ‍ॅक्टींग सोडली आणि ती फिल्म मेकिंग शिकण्यासाठी न्यूयॉर्कला गेली. यानंतर तिनं तारक मेहतामध्ये काम करायला सुरुवात केली. आजही ती मालिकेचा हिस्सा आहे. रिअल लाईफमध्ये ती एकदम स्टायलिश आणि खूप वेगळी आहे.

https://www.instagram.com/p/B9YVnm5pjTz/

https://www.instagram.com/p/B85ZCJYHhOr/

https://www.instagram.com/p/B8VbD0aJO9o/

https://www.instagram.com/p/B64kWVEJIHr/

https://www.instagram.com/p/B6uvf9NJ3Ug/

https://www.instagram.com/p/B6QurympYTa/

https://www.instagram.com/p/B2ehsizJ9gI/