Video : आश्चर्यजनक ! आईच्या पोटातच जुळ्यांची भांडणं ; व्हिडिओ व्हायरल

बीजिंग : वृत्तसंस्था – आतापर्यंत कधीही न ऐकलेली आणि न पाहिलेली घटना समोर आली आहे. ही घटना समजल्यानंतर तुम्ही थक्क झाल्याशिवाय राहणार नाहीत. ह्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होताना दिसत आहे. आईच्या गर्भामध्ये भांडणाऱ्या दोन जुळ्यांचा हा व्हिडिओ आहे. दोन जुळ्यांनी गर्भात भांडण करणं ही दुर्मिळातील दुर्मिळ घटना आहे.

व्हायरल झालेला हा व्हिडीओ चीनमधील असून एका आईच्या सोनोग्राफीचा आहे. या व्हिडीओमध्ये आईच्या गर्भामध्ये दोन जुळी अर्भक एकमेकांशी भांडताना दिसत आहेत. हा व्हिडीओ साधारणतः वर्षभरापूर्वी चीनमधून शेअर करण्यात आला होता. ही महिला चार महिन्यांची गर्भवती असताना तिने चीनमधील यिनचुआनमध्ये एका क्लिनिकमध्ये अल्ट्रासाउंड केलं होतं. त्यावेळी या बाळांच्या वडिल ‘टाओ’ यांनी त्यांच्या अर्भकांचा हा व्हिडिओ कॅमेऱ्यात शूट केला होता. त्यांनतर त्यांनी एका अ‍ॅपवरून शेअर केला होता.

मुलीच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यानंतर आणखी एक अल्ट्रासाउंड करण्यात आलं होतं, त्यामध्ये दोघी एकमेकींना मिठी मारत होत्या.आता या मुलींचा जन्म झाला आहे. एकीचं नाव चेरी आणि दुसरीचं नाव स्ट्रॉबेरी ठेवण्यात आलं आहे. माझ्या दोन्ही मुली फार गोड आहेत. त्या एकमेकींची फार काळजी घेतात. मोठ्या झाल्यावर या दोघी कायम एकत्र असतील.’ या अल्ट्रासाउंड व्हिडीओबाबत सध्या सोशल मीडियावर अनेक चर्चा रंगल्या आहेत.

https://www.youtube.com/watch?v=sS-4sWOgjCY