‘Twitter’ यूजर्सची दिवाळी ‘प्रकाशमान’, लॉन्च केले खास ‘Emoji’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – दिवाळी सण लक्षात घेऊन Twitter ने आपल्या यूजरसाठी इमोजी लॉन्च केले आहेत, यूजर लाइट्स ऑन या इमोजी सह आपल्या टाइमलाइनवर दिवाळीला शेअर करु शकतील. या इमोजीमध्ये डार्क मोडमध्ये पणतीच्या प्रकाशासारखा प्रकाश कमी जास्त करण्याची सुविधा आहे. Twitter चं हे नवं फीचर 29 ऑक्टोबरपर्यंत सर्वासाठी उपलब्ध होईल. म्हणजेच या दिव्याच्या सणात आपले ट्विटर खाते प्रकाशित करु शकतात. हे नवे फीचर अ‍ॅण्ड्राइड, आयओएस दोन्हीसाठी उपलब्ध असेल.

सणासुदीला लॉन्च केलेले या इमोजी लाइट्स ऑन चा वापर करुन यूजर्स आपली टाइमलाइन प्रकाशित करु शकतात. हे फीचर यूजर्सच्या पसंतीला उतरेल असे सांगण्यात येत आहे. हे फीचर dim आणि lights out या दोन्ही वेरिएंटसाठी उपलब्ध असेल.

कंपनीने मागीलवेळीच lights out फीचर रोल आउट केले होते, ज्याचा वापर यूजर आपला इंटरफेस डार्क ब्लू किंवा ग्रे थीम शिवाय ब्लॅक करु शकतो. या फीचरमुळे कमी बॅटरी वापरली जाते. ट्विटरवर Lights Out फीचर अनेबल केल्यानंतर तुम्हाला अ‍ॅपच्या सेटिंग्स अ‍ॅण्ड प्रायवसीमध्ये जावे लागेल. ज्यानंतर तुम्हाला Lights Out फीचर दिसेल. त्याला अनेबल केल्यानंतर तुम्ही या फीचरचा आनंद घेऊ शकता.

ट्विटरचे डिम वेरिएंट पहिल्यापासून वेब वर्जन, आयओएस आणि अ‍ॅण्ड्राइट वर्जनसाठी उपलब्ध आहे जर lights out हा पर्याय वेब आणि आयओेएस वर्जनवर उपलब्ध आहे. कंपनी पुढील आठवड्यात अ‍ॅण्ड्राइड वर्जनवर उपलब्ध करुन देईल. यामुळे यूजरच्या डिवाइसची बॅटरी वाचेल, विशेष म्हणजे यूजर ट्विटरच्या हॅशटॅगचा वापर करुन 11 भाषामध्ये दिवाळीचा आनंद लुटू शकतात. या भाषामध्ये हिंदी, मराठी, बंगाली, गुजराती, इंग्लिश, कन्नड, मल्याळम, पंजाबी, उडिया, तेलगू यासारख्या भाषांचा समावेश आहे.

Visit : policenama.com  

डोळ्यांचा रुक्षपणा घालवण्यासाठी करा ‘हे’ ४ घरगुती उपाय, घ्या जाणून
कानाच्या ‘या’ ५ समस्यांवर हे आहेत घरगुती उपाय ; जाणून घ्या 
‘हे’ ६ घरगुती उपाय करा आणि तात्काळ उचकी थांबवा
‘वेटलॉस’ बाबतचे ‘हे’ १० गैरसमज नुकसानकारकचं !
नियमितपणे १० दिवस ‘वेलची’ खा आणि ‘वजन’ घटवा