काय सांगता ! होय, 8 वर्षांपुर्वीच ट्विटरवर झाली होती कोबी ब्रायंटच्या हेलिकॉप्टर अपघाताची ‘भविष्यवाणी’

कॅलिफोर्निया : वृत्तसंस्था – जगातील सर्वात प्रसिद्ध आणि दिग्गज बास्केटबॉल पट्टू कोबी ब्रायंट यांचा 26 जानेवारी रोजी हवाई दुर्घटनेत मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूची बातमी समजताच केवळ क्रिडाविश्वात नाही तर जगभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मात्र, त्यांच्या मृत्यूबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोंबी ब्रायंट यांचा मृत्यू हेलिकॉप्टर अपघातात होईल अशी भविष्यवाणी आठ वर्षापूर्वी एका व्यक्तीने ट्विटरवर केली होती. या व्यक्तीने केलेली ही भविष्यवाणी तंतोतंत खरी ठरली आहे.

कोबे ब्रायंटच्या मृत्यूबाबत ट्विटरवर त्यांच्या मृत्यूची माहिती देण्यात आली होती. @dotnoso नावाच्या एका ट्विटर अकाऊंटवरून कोबे ब्रायंट यांचा मृत्यू हेलिकॉप्टर अपघातात होईल असे भाकीत करण्यात आले होते. ही भविष्यवाणी खरी झाल्यानंतर आता ते ट्विट इंटरनेटवर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे.
ट्विटर युझरची भविष्यवाणी खरी ठरल्यानंतर, याबाबत राग व्यक्त केला जात आहे. त्याबरोबर काही मिम्सही तयार केले जात आहेत. तर कोबे हा अनेकदा हेलिकॉप्टरचे सारथ्य स्वत: करत होता त्यामुळे त्याच्या मृत्यूबाबत भाकीत करणारे ट्विट या संदर्भात केले असावे अशी अटकळ काही ट्विटर युझर्सनी बांधली आहे. हेलिकॉप्टर दुर्घटनेत 41 वर्षीय कोबी ब्रायंटसह त्यांच्या 13 वर्षीय मुलीचाही मृत्यू झाला आहे.

कोबी ब्रायंटने आपल्या 20 वर्षाच्या कारकीर्दीत अनेक विक्रम केले. त्यांनी नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनकडून खेळताना पाच स्पर्धाही जिंकल्या. कोबी त्याच्या करिअरमध्ये 18 वेळा एनबीए ऑल स्टार ठरला. 2012 आणि 2008 च्या औलिम्पिकमध्ये अमेरिकेसाठी दोन सुवर्णपदकेही जिंकली होती. कोबी ब्रायंटच्या मृत्यूमुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला. सोशल मीडियावर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार रोहित शर्मा याच्यासह अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, माजी राष्ट्रध्यक्ष बराक ओबामासह अनेकांनी दु:ख व्यक्त केले होते.