2 हत्तीमध्ये धडकी भरवणारी लढाई (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   सोशल मीडियावर पक्षी-प्राणी आणि जनावरांचे एकपेक्षा एक सरस आणि मजेदार व्हिडिओ व्हायरल होतात. असाच एक व्हिडिओ असून दोन हत्तीमध्ये धडकी भरवणारी लढाईचा खतरनाक व्हिडीओ झाला व्हायरल प्रत्येकाला प्राण्यांच्या लढाईचे व्हिडिओ पाहायला आवडतात. नेटकरी अशा व्हिडिओला जास्त पसंती दर्शवतात. असाच मनाला धडकी भरवणारा दोन हत्तींच्या लढाईचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडिओला इंडियन फॉरेस्ट सर्विसमधील आधिकारी प्रवीण कासवान यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. सध्या नेटकरी हा व्हिडिओ इतर सोशल मीडियावर प्लॅटफॉर्मवरही शेअर करत आहेत.

शेतामध्ये दोन हात्तींची एकमेंकाशी लढाई सुरू आहे. लढाईच्या सुरूवातीला दोघेही एकमेंकाना सोंडेने मारतात. त्यानंतर दोन्ही हात्ती ताकद एकमेंकाना दाखवत मागे ढकलण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रवीण कासवान यांनी व्हिडिओ शेअर करताना लिहलेय की, ‘जेव्हा हात्तींची लढाई होते त्यावेळी जमीन हादरते. कर्मचार्‍याने पाठवलेला व्हिडिओ.’ या व्हिडिओला तीन मे रोजी शेअर केले आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 25 हजारांपेक्षा जास्त जणांनी पाहिले आहे. तसेच नेटकर्‍यांनी या व्हिडिओला हजारो लाइक आणि शेकडो रिट्विट केले आहे.