2 भारतीय जवान ‘हनीट्रॅप’च्या जाळ्यात ! ‘फेसबुक’वरुन सुरु होती ‘चॅटिंग’
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय लष्करातील दोन जवानांना अनोळखी फेसबुक प्रोफाइलशी चॅटिंग केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. सोशल मिडियाचा गैरवापर करुन पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा हॅनीट्रपचा मार्ग वापरत आहेत. या प्रकरणी राजस्थान पोलिसांकडून कारवाई करण्यात आली.
चॅटिंगद्वारे पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांना माहिती पुरवल्याप्रकरणी राजस्थान पोलिसांनी त्यांना अटक केली. ‘सीरत’ नावाच्या फेसबुक प्रोफाईलशी या दोन जवानांचा संबंध होता. महिलेचे नावाने सुरु असलेल्या या फेसबुक अकाऊंटवर हे जवान चॅटिंग करीत होते. लान्स नाईक रवी वर्मा आणि शिपाई विचित्रा बेहरा अशी अटक करण्यात आलेल्या दोन लष्कराच्या जवानांची नावे आहेत. पाकिस्तानकडून साधण्यात आलेला हा हनीट्रॅपचा प्रकार असल्याचे लष्कराच्या सुत्रांनी सांगितले.
दोन जवांनाना संंबंधित फेसबुक प्रोफाइलसोबत एकाच वेळी चॅटिंग करताना रंगेहाथ ताब्यात घेतले. गुप्तचर यंत्रणा आणि सीआयडीसह राजस्थान पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली. ऑक्टोबर महिन्यात भारतीय लष्करांने गुप्तचर यंत्रणांकडून अशा प्रकारे माहिती काढून घेण्याच्या तंत्राची माहिती देत जवानांना सावधनतेचा इशारा दिला होता. त्याप्रमाणे अनोखळी व्यक्तीबरोबर सोशल मिडियावर कोणत्याही माहितीची देवाण घेवाण करु नये. इंश्युरन्स एजेंट, बोगस बाबा यांच्यापासून सावध राहावे. परंतू लष्कराच्या या बाबीकडे दुर्लक्ष केल्याने राजस्थान पोखरण मध्ये तैनात एकाच युनिटमधील दोन जवांनाना अटक करण्यात आली आहे, ते पाकिस्तानच्या जाळ्यात अडकले होते.
Visit : Policenama.com
तुमच्या चुकीच्या जीवनशैलीमुळे सुद्धा होऊ शकतो ‘मायग्रेन’ चा त्रास
भेसळयुक्त ‘कुंकू’ वापरले तर होऊ शकतात ‘गंभीर’ परिणाम, जाणून घ्या
शरीरयष्टी किरकोळ असेल तर ‘हे’ 6 पदार्थ खा, दिसाल सेलिब्रिटींसारखे फिट
चेहऱ्याचे सौंदर्य खुलवण्यासाठी करा ‘हे’ 5 घरगुती आणि सोपे उपाय, जाणून घ्या
चुकीनही करू नका ‘यो यो डाएट’, बिघडू शकते तब्येत, जाणून घ्या
‘जंक फूड’ खाण्याची सवय सोडविण्यासाठी ‘हे’ 5 खास उपाय, जाणून घ्या
सावधान ! प्लॅस्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय ? जाणून घ्या धोके