नाशिक : सिन्नरमध्ये भरधाव वाहनाच्या धडकेत 2 बछड्यांचा मृत्यू

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन – नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील डुबेरे सोनारी रस्त्यावर भरधाव वाहनाच्या धडकेत बिबट्याच्या दोन बछड्यांचा मृत्यू झाला आहे. या बछड्यांचा जागीच मृत्यू झाला असून सोमवारी म्हणजेच आज हि घटना लक्षात आली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी कि, मादी आणि तिचे तीन बछडे या रस्त्यावरून जात असताना या दोन बछड्यांचा भरधाव वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. त्यानंतर वनविभागाला दिलेल्या माहितीनुसार त्यांनी या वाचलेल्या मादी बिबट्या आणि तिच्यापासून गावकऱ्यांचे रक्षण करण्यासाठी सुरक्षेच्या उपाययोजना केल्या आहेत. त्याचबरोबर या वाहनाचा देखील वनविभागाकडून शोध घेण्यात येत असून त्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे उपवनसंरक्षक शिवाजी फुले यांनी सांगितले.

दरम्यान, अपघातात मृत पावलेल्या बिबट्याच्या दोन बछड्यांचे शवविच्छेदन करण्यात आले असून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली.

आरोग्यविषयक वृत्त

You might also like