काॅलेजच्या कॅन्टीनमध्ये काम करणार्‍या ‘त्या’ दोघांचे मृतदेह सापडल्याने खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कात्रज येथील पीआयसीटी कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये काम करणारे दोघे जण त्यांच्या खोलीमध्ये मृतावस्थेत सापडले असल्याची घटना समोर आली आहे. अजय राजू बेलदार (वय २०, रा. जळगाव) आणि अनंता खेडकर (वय २०, रा बुलढाणा) अशी त्यांची नावे आहेत. प्राथमिक चौकशीत पेस्ट कंट्रोलमुळे त्यांचा मृत्यु झाल्याची माहिती पुढे आली आहे.

हेही वाचा – पुण्यात चाकूने सपासप वार करुन महिलेचा खून 

हे दोघेही गेल्या एक वर्षापासून कॉलेजच्या कॅटीनमध्ये काम करतात. कॉलेजच्या कॅटिनमध्ये काम केल्यावर दोघेजण त्यांच्या खोलीत जाऊन झोपले. दुसऱ्या दिवशी दोघेही कामाला न आल्याने कॅटिनचा मॅनेजर त्यांना पहाण्यासाठी त्यांच्या खोलीवर गेला. दार वाजवूनही ते न उघडल्याने त्यांनी मागील बाजूची खिडकी तोडून आत प्रवेश केला. तेव्हा दोघेही बेशुद्धावस्थेत आढळून आले. त्यांना तातडीने भारती हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. परंतु, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यु झाला होता. या घटनेची माहिती दोघांच्याही नातेवाईकांना देण्यात आली. त्याचे नातेवाईक आज सकाळी पुण्यात आले.

हेही वाचा – पुण्यातील कर्णबधीर तरुणीवर मामाच्या मुलाने केला लैंगिक अत्याचार

भारती विद्यापीठ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघेही एकाच खोलीत रहात होते. त्यांनी दोन दिवसांपूर्वी खोलीत पेस्ट कंट्रोल केले होते. त्यामुळे पहिल्या दिवशी ते मित्रांच्या खोलीवर जाऊन राहिले होते. एक दिवसानंतर ते आपल्या खोलीवर झोपायला गेले होते. मात्र, या विषारी औषधामुळे त्यांचा मृत्यु झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. आज नातेवाईकांच्या उपस्थितीत दोघांचे शवविच्छेदन करण्यात येणार असून त्यातून मृत्युचे खरे कारण स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Loading...
You might also like