पुणे-बंगळूर महामार्गावर पावणे दोन कोटीचा गुटखा जप्त

गोकुळ शिरगाव (कोल्हापूर) : पोलीसनामा ऑनलाईन – पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर साताऱ्याहून बंगळूरच्या दिशेने गुटखा घेऊन जाणाऱ्या दोन ट्रकला ताब्यात घेऊन पोलिसांनी पावणे दोन कोटींचा गुटखा जप्त केला. याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई गोकुळ शिरगाव पोलीस व अन्न औषध प्रशासन विभागाने केली.

याप्रकरणी दोन ट्रक (एमएच 11 ए 5505) व (एमएच 21 एक्‍स 7740) ताब्यात घेत चालक सलमान अमितखान व परवेज अजीज उल्ला खान यांना अटक करण्यात आली आहे. पुणे-बेंगळूर राष्ट्रीय मार्गावरुन दोन ट्रकमधून गुटख्याची वाहतूक होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी महामार्गावर सापळा रचून दोन ट्रक आडवले. या ट्रकची तपासणी केली. ट्रकमध्ये 120 (रोयॉल 717 सुगंधी तंबाखू कंपनीची 150 पोती), रोयॉल 717 सुगंधी हिरा पान मसाला कंपनीची 290 पोती) असा सुमारे पावणे दोन कोटीचा सुगंधी पान मसाला तंबाखू (मिश्रित) गुटखा आढळून आला.

पोलिसांनी सर्व साहित्यासह ट्रक चालकांना ताब्यात घेतले आहे. आचारसंहिता सुरू होताच महामार्ग पोलिसांनी उजळाईवाडी हद्दीत शिताफीने कारवाई करत सुगंधी तंबाखू व पान मसाला पकडला. महामार्गचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अविनाश पोवार, सहायक फौजदार शंकर कोळी, हवालदार संदीप पाटील, तात्यासाहेब मुंढे, रवींद्र नुल्ले, प्रकाश कदम, शहाजी पाटील, योगेश कारंडे, अभिजित चव्हाण, तौसिफ मुल्ला, आशिष कोळेकर, रामदास मेंटकर आदींनी ही कारवाई केली.

ह्याहि बातम्या वाचा –

नोकरीच्या अमिषाने तरुणीला ५० हजारांचा गंडा

सुरेखा पवार यांना गुरू-शिष्य पुरस्कार बबन माने यांचाही होणार गौरव

पुणे : संभाजी कदम आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त

बँक ऑफ महाराष्ट्रवर फिल्मी स्टाईल दरोडा

ICC कडे भारतीय खेळाडूंची तक्रार करणारा पाकिस्तान तोंडावर आपटला