हिंदू राष्ट्र संघटनेचा कट्टर संघटक तुषार हंबीरवर येरवडा तरुंगात खुनी हल्ला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – हिंदू राष्ट्र संघटनेचा कट्टर संघटक तुषार हंबीर याच्यावर येरवडा कारागृहात खुनी हल्ला झाला असून आरोपींच्या वादातून ही घटना घडली आहे. या घटनेत शाहरूख शेख याने कारागृहातील शौचालयाच्या बाहेर तुषारवर खिळ्याने हल्ला केला. या हल्ल्यात तुषारच्या मानेवर आणि डोक्यावर गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, तुषार हा हिंदू राष्ट्र संघटनेचा संघटक असून हडपसर येथे झालेल्या मोहसीन शेख खून प्रकरणातील तो आरोपी आहे. येरवडा कारागृत शाहरूख शेख याने येरवडा कारागृहात असलेल्या तुषारवर खिळ्यांनी हल्ला चढवला. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्याला तुरुंग प्रशासनाने तातडीने ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

या घटनेची माहिती मिळताच, तुरुंग प्रशासनाने बंदोबस्त वाढवला असून वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. या घटनेमुळे कारागृह परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, घटनेची चौकशी करून दोषीवर कठोर कारवाई करणार असल्याचे तुरुंग प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

बुद्धविहार तसेच उर्वरित रहिवाशांचे त्याच ठिकाणी पुनर्वसन करणार

विना परवाना शेकडो खड्डे खोदल्याने नगर परिषदेचा समोर आला गलथान कारभार

दिवसभर थकणाऱ्या हातांनादेखील रिलॅक्स करणे गरजेचे

हिंमत असेल तर आगामी विधानसभा निवडणूक बॅलेट पेपरवर घ्यावी’

पोट आणि कंबर अधिक आकर्षक करण्यासाठी करा’स्ट्रेचिंग’

शरीराला पाण्याची गरज का असते ? जाणून घ्या ही ५ कारणे

Loading...
You might also like