लाल किल्ल्याजवळ ISIS च्या दोन दहशतवाद्यांना अटक, राजधानीत खळबळ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

दिल्लीतील लाल किल्ल्याजवळून दोन ISISच्या दोन दहशतवाद्यांना अटक केली आहे. ही कारवाई दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेच्या पथकाने गुरुवारी (दि.६) रात्री लाल किल्ल्याजवळ असलेल्या जामा मशीद येथील बस स्टॉपवर करण्यात आली. अटक करण्यात आलेले दोन्ही दहशतवादी इस्लामिक स्टेट इन जम्मू काश्मीरशी जोडले असल्याची पोलिसांची माहिती आहे. दोघांनाही न्यायालयात हजर केले असता त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
[amazon_link asins=’B0073C7IIK,B01N4J3WAE’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’7efcb3f0-b29d-11e8-b37c-c5b37cb05cea’]

अटक करण्यात आलेल्या दोन दहशतवाद्यांकडून दोन पिस्तूल, १० काडतुसे, ४ मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत. ही शस्त्रे त्यांनी उत्तर प्रदेशातून खरेदी केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. हे दहशतवादी दिल्लीहून काश्मीरला जात होते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांपैकी एक दहशतवादी काश्मीरमध्ये राहतो. दोघांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला असून गुप्तचर यंत्रणा दोघांची चौकशी करत आहेत. यापैकी परवेझ याच्या भावाचा मृत्यू जानेवारीत सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीत झाला होता. परवेझ आधीपासून दहशतवादी संघटना हिज्बुल मुजाहिदीनचा सदस्य होता आणि नंतर त्याने इस्लामिक स्टेट इन जम्मू काश्मीर जॉइन केली.
[amazon_link asins=’B0734VLDTC,B009WNA9V6′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’87e6f5f7-b29d-11e8-9d36-153e576c00eb’]

या दोन्ही दहशतवाद्यांची दिल्लीत कोणता हल्ला घडवण्याची कुठलीही योजना नव्हती. त्यांचा पहिला नेता उमर नजीर तर दुसऱ्या क्रमांकाचा नेता आदिल थोकर आहे. दोघेही आदिल थोकरच्या आदेशानुसार काम करत होते. त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या

‘अॅट्रोसिटी’तील बदलाची सुप्रीम कोर्ट पडताळणी करणार 

मुंबई : राम कदमांचा आणखी एक प्रताप, जीवंत अभिनेत्रीला वाहिली श्रद्धांजली 

उपोषणाचा तेरावा दिवस: हार्दिकची प्रकृती खालावली, रुग्णालयात दाखल 

आता कार्डाशिवाय एटीएममधून पैसे काढता येणार

पोरगी पळवून आणू, तुझ्या काय बापाची ठेव आहे का?