स्वाईन फ्ल्यूचे एकाच दिवशी दोन बळी

पिंपरी चिंचवड : पोलीसनामा ऑनलाईन

पिंपरी चिंचवडमध्ये स्वाईन फ्लूचे एकाच दिवशी दोन बळी गेल्याच समोर आलं आहे. त्यामुळे स्वाईन फ्ल्यूच्या बळीचा आकडा आता अकरा वर पोहचला आहे. ३२ आणि ५२ वर्षीय पुरुषाचा यात समावेश आहे. दोघांवर पिंपरी-चिंचवड शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते.

जाहिरात

जानेवारी पासून शहरात ६९ रुग्ण आढळले, पैकी अकरा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर २३ रुग्णांवर सध्या उपचार सुरू, त्यातील चौघांची प्रकृती चिंताजनक आहे. जानेवारी ते जून दरम्यान एकच रुग्ण दगावला होता. तर ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक म्हणजे १० जणांचा मृत्यू झाला आहे. शहरातील वाल्हेकरवाडी आणि अजमेर वसाहत येथील ५२ वर्षीय पुरुषाला २४ ऑगस्ट रोजी रुग्णालयात दाखल केल होतं तर येथील ३२ वर्षीय पुरुषाला ३१ऑगस्ट रोजी खासगी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले. मात्र दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना अतिदक्षता विभागात उपचार सुरू करण्यात आले, परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.

डीएसकेंवरचा धडा वगळण्याचा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा आदेश

जाहिरात

सद्य स्थितीला शहरात ऐकून २३ जण बाधित रुग्ण आढळले असून त्यांच्यावर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर ४ जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. गेल्या काही दिवसांपासून शहरातील नागरिकांमध्ये स्वाईन फ्ल्यू विषयी धास्ती वाढली आहे. परंतु महानगर पालिका याकडे गांभीर्याने पाहत नसल्याचं स्पष्ट होत आहे. गेल्या वर्षी देखील ६१ जणांचा मृत्यू हा स्वाईन फ्ल्यूमुळे झाला होता.

कर्नाटकात विजयी मिरवणुकीत अॅसिड हल्ला