साथीच्या आजारांचे थैमान ! राज्यात डेंगीचे 2064 तर हिवतापाचे 4061 रूग्ण

पोलिसनामा ऑनलाइन – सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत आणि अशा वेळेस आजूबाजूला सतत ओलावा असल्यामुळे रोगराई पसरायलाही सुरवात होते. राज्यात २ हजार ६४ डेंगीचे रुग्ण आढळून आले असून तीन जणांचा मृत्यू झाला आहे. हिवतापाचे ४ हजार ६१ रुग्ण आढळून आले असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन राज्याच्या साथरोग विभागाने केले आहे. तसेच साथरोग विभागाचे सहसंचालक डॉ. प्रकाश भोई यांनी याबाबतची अधिक माहिती दिली आहे, हिवताप विशिष्ट ऋतूत होणारा आजार आहे. या आजारांचे जास्तीत जास्त प्रमाण जुलै ते नोव्हेंबर या कालावधीत आढळते. तापमान, आर्द्रता, पर्जन्यमान, सांडपाण्याचे नियोजन इत्यादी बाबी हिवताप प्रसारास कारणीभूत ठरतात.

पावसाळ्यातील अनेक आजार हे डेंगीच्या ‘एडिस इजिप्त’ नावाचा डास चावल्यामुळे होतात त्यामुळे स्वच्छता ठेवणे खूप महत्वाचे आहे. हा डास दिवसा चावणारा असून या तापाचा प्रसार माणसांपासून डासांना आणि परत माणसांना होतो.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like