बालपणीच्या मित्रांवर काळाचा घाला, अपघातात 3 मित्रांचा जागीच मृत्यू

गोंदिया : पोलीसनामा ऑनलाइन – गोंदियामध्ये झालेल्या एका रोड अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अर्जुनी तालुक्यातील खजरी इथल्या बस स्थानकासमोर सकाळी दहाच्या सुमारास हा अपघात झाला. दुचाकीवर जाणाऱ्या तीन मित्रांना टाटा पिकअपने धडक दिली. यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला.

समोरासमोर झालेल्या धडकेत दुचाकीवरील तिघांचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. मृत तरुण हे गडचिरोली जिल्ह्यातील गांगलवाडी तहसीलमधील आरमोरी येथील असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मृत तरुण हे बालपणीचे मित्र असल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिले. मृत तरुणांची ओळख पटली नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे तिघेजण दुचाकीने जात असताना समोरून येणाऱ्या पिकअप आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. स्थानिकांनी अपघाताची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृत तरुणाचे मृतदेह ताब्यात घेऊन ते शवविच्छेदनसाठी नजीकच्या रुग्णालयात पाठवून दिले. अपघात नेमका कसा झाला याचा तपास पोलीस करणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

Visit : Policenama.com