नामांकित मॉलमधील हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – ठाणे शहरातील नामांकित मॉलमधील रेस्टॉरंटमध्ये सुरु असलेल्या हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा ठाणे अनैतिक मानवी वाहतूक शाखेच्या पथकाने पर्दाफाश केला आहे. याप्रकरणात दोन बहिणींसह एका महिलेची सुटका करण्यात आली आहे. तर दोन दलालांना पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई शुक्रवारी करण्यात आली असून आरोपींना १८ फेब्रुवारीपर्य़ंत पोलीस कोठडी मिळाली आहे.

मानवी ऊर्फ पल्लवी गुवारिया (वय -२० रा. मालाड), सुमितसिंग सिंग (वय – ४१, रा. कांदिवली) असे अटक करण्यात आलेल्या दलालांची नावे आहेत. ठाण्यातील लेकसिटी मॉलमधील रेस्टॉरंटमधून मानवी गुवारिया ही रिक्षाचालक सिंग याच्या मदतीने देहविक्रीसाठी महिला पुरवत होती. मानवी ही गरीब आणि गरजू तरुणींना पैशांचे अमिष दाखवून देहविक्री व्यवसाय करण्यास भाग पाडत होती. याची माहिती ठाणे अनैतिक मानवी वाहतूक शाखेच्या पथकला मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांच्या पथकाने लेकसिटी मॉलमधील रेस्टॉरंटमध्ये सापळा रचला.

त्यावेळी मानवी गवारिया व तिचा रिक्षाचालक साथीदार सुमितसिंग हे दोघेही तीन गरीब महिलांना देहविक्रीसाठी ग्राहकांसोबत पाठवत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर, पोलीस पथकाने दलाल मानवीसह रिक्षाचालक सिंग या दोघांना अटक केली. याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक व्ही.व्ही. मोसमकर करत आहेत.