Jalna News : शेततळ्यात बुडून 2 जणांचा मृत्यू

जालना : पोलीसनामा ऑनलाईन – जालना तालुक्यातील पीर-पिंपळगाव येथील शेततळ्यात २ जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. हे दोघे या शेततळ्यात पोहण्यासाठी गेले होते. मृत्यू झालेल्या तरुणांची नावे गजानन जोरले आणि कैलास खरात आहेत. हे दोघेपण जालना येथील आहेत. शेततळ्यात पोहत असताना अचानक कसे बुडाले हे अजून समजू शकलेले नाही.

या घटनेची माहिती चंदनझिरा पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक शिवाजी पोहार व पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी पोहोचून तेथील नागरिकांच्या मदतीने शेतळ्यातून मृतदेह बाहेर काढून त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. याबाबतीत चंदनझिरा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.