‘UBER’ देणार ‘अपघाती’ विमा, दुर्घटनेत ‘मृत्यू’ झाल्यास ‘कुटूंबाला’ 5 लाख रुपये

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ऑनलाइन टॅक्सी सेवा देणारी जगातील सर्वात मोठी कंपनी उबेरने आता टॅक्सी चालकांना अपघाती विमा देण्याची घोषणा केली आहे. कंपनीने ही माहिती बुधवारी देताना सांगितले की कार, ऑटो किंवा मोटरसायकल अशा कोणत्याही सेवेला देणाऱ्या चालकाला विम्याचा लाभ मिळेल. कंपनी चालकाच्या मृत्यू झाल्यास किंवा व्यंगता आल्यास अशा परिस्थितीत चालकाला किंवा त्याच्या कुटूंबाला विम्याचे 5 लाख रुपये देणार आहे. या विमा योजनेअंतर्गत हॉस्पिटलायजेशनसाठी 2 लाख रुपये विमा सुरक्षा मिळेल. एवढेच नाही तर 50,000 रुपयांपर्यंतचे ओपीडी बेनेफिट मिळेल.

उबेरने यासाठी भारती एक्साबरोबर करार केला आहे. तसेच ऑटो आणि मोटो रायडरसाठी टाटा एआयजीबरोबर करार केला आहे. उबेर देशात 40 शहरात सेवा देते.

चालक वाहन चालताना स्वत:ला सुरक्षित समजतील –
भारत आणि दक्षिण अशियामधील उबेरच्या सेंट्रल ऑपरेंस (राइड्स) चे प्रमुख पवन वैश यांनी सांगितले की, आम्ही चालकांशी बोलून आमच्या सेवेला अधिक चांगली बनवण्याचा प्रयत्न करत आहे. आमचा प्रयत्न आहे की चालकांना सुरक्षित अनुभव देणे. आम्ही पहिल्यांदाच चालकांसाठी विम्याची घोषणा केली आहे. आज घोषणेसह मला पूर्ण विश्वास आहे की आमचे चालक वाहन चालताना स्वत:ला सुरक्षित समजतील.

वैश म्हणाले की आता पर्यंत अपघाताचे खूपच कमी प्रकरणे समोर आली. परंतू कंपनीचा जोर चालकांच्या सुरक्षेवर आहे. ते म्हणाले की चालकाच्या कॅबमध्ये बसल्यापासून ते ट्रिप पूर्ण होई पर्यंत शरीराला कोणतीही जखमी झाल्यास विम्याचा लाभ मिळेल.

कंपनीला अशी कळवू शकतात अपघाताची माहिती –
चालकाने पास्ट ट्रिप्स सेक्शनवर जावे, यानंतर त्यात ‘आय वाॅज इंवालव्ड इन कार अ‍ॅक्सिडेंट’ हा पर्याय निवडावा. वैश यांनी सांगितले की सपोर्ट टीम यानंतर चालकाला संपर्क करेल आणि क्लेम देण्यासाठी विमा भागीदाराबरोबर को – ऑर्डिनेट करेल.

Visit : policenama.com