Uday Samant | उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले – ‘देवेंद्र फडणवीसांसोबतच्या बैठकीतच ठरलं’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Uday Samant | ज्यांनी बंडखोरी केली ते आजही माझ्याबद्दल आणि ठाकरे कुटुंबीयांबद्दल (Thackeray Family) प्रेम, आदर व्यक्त करत आहेत. त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो. पण ज्यावेळी माझ्या कुटुंबीयांवर अश्लाघ्य भाषेत टीका केली गेली त्यावेळी यातला एकही जण बोलला नव्हता. तेव्हा तुमची दातखिळी बसली होती का?, असा घणाघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena Chief Uddhav Thackeray) यांनी आज पत्रकार परिषदेत केला होता. यावर आता शिंदे गटातील (Shinde Group) बंडखोर आमदार (Rebel MLA) आणि माजी मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी उत्तर दिले आहे.

 

उदय सामंत (Uday Samant) म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावर मी प्रतिक्रिया देणे योग्य नाही. कारण, मी आज या उंचीवर त्यांच्यामुळेच पोहोचलो आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेना वाचविण्यासाठीच हा निर्णय घेतला. एकनाथ शिंदे यांनी अद्याप एकदाही शिवसेनेवर टिका केलेली नाही. धनुष्यबाण (Dhanushya Ban) हे चिन्ह (Shivsena Symbol) आपल्याला मिळावे म्हणून त्यांनी कुठेही प्रयत्न केला नाही. महाराष्ट्रातील जनतेने संभ्रम निर्माण करून घेऊ नये.

 

उदय सामंत पुढे म्हणाले, मी 12 ते 13 दिवसांनंतर माध्यमांसमोर आलो आहे. कोण कुणाला मंत्री करतोय हे माहिती नाही. पण, माझ्यावर एखादी जबाबदारी टाकल्यास मी नक्कीच यशस्वीपणे पार पाडेन.

 

ठाकरे कुटुंबियांवर झालेल्या टिकेबाबत उदय सामंत म्हणाले, उद्धव ठाकरे आणि ठाकरे कुटुंबीयांवर झालेल्या टीकेचे आजही आम्हाला दुख आहे.
आमच्या बैठकीतही आम्ही सांगितले आहे. ज्यावेळी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)
यांचे आमच्यासमोर भाषण झाले. त्यावेळी, ठाकरे कुटुंब आणि ठाकरे कुटुंबातील एकाही सदस्यांवर टिका होऊ नये,
एवढा आदर त्यांचा राखला पाहिजे, असे फडणवीसांनी सांगितले होते.
कुणी टिका करत असेल तर ही गोष्ट आम्ही फडणवीस आणि शिंदे यांच्यापर्यंत नक्कीच पोहोचवू.

आज शिवसेना भवनातील (Shivsena Bhavan) पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांवर खोचक शब्दांत निशाणा साधला.
त्यांनी बंडखोरांचे हात जोडून आभारही मानले. यानंतर शिंदे गटातील उदय सामंत यांनी वरील प्रतिक्रिया दिली आहे.

 

पक्षचिन्हबद्दल काय म्हणाले ठाकरे…
उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, धनुष्यबाण शिवसेनेचा आहे आणि तो कुणीही हिरावून घेऊ शकत नाही.
धनुष्यबाण हे जरी निवडणूक चिन्ह (Election Symbol) असले तरी ते हाती घेतलेल्या लोकांचीही चिन्ह लोक लक्षात घेतात.
माणसांना बघून लोक मतदान करत असतात. त्यामुळे मी जे बोललो त्याचा अर्थ नवीन चिन्हाचा विचार करा असा अजिबात नाही.
धनुष्यबाण कधीच कुणी शिवसेनेकडून हिरावून घेऊ शकत नाही.

 

Web Title :- Uday Samant | cm eknath shinde it was decided in the meeting with devendra fadnavis uday samant clearly stated

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Deepali Sayed | ‘मेलेल्या आईचं दूध पिऊन सत्तेत गेलात का ?’ – दीपाली सय्यद

 

Ajit Pawar | अजित पवार यांच्या उपस्थितीत 10 जुलैला गुरुजन गौरव सोहळा

 

Kirit Somaiya | किरीट सोमय्यांच्या वक्तव्यावर शिंदे गटाच्या आमदाराचा इशारा, म्हणाले – ‘…अन्यथा आम्हाला सत्तेची पर्वा नाही’