Uday Samant | व्यावसायिक प्रवेशास 12 वी चे 50 % गुण ग्राह्य धरणार – उदय सामंत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुढील शैक्षणिक वर्षापासून इयत्ता बारावीच्या 50 टक्के आणि सीईटीच्या (CET Exam) 50 टक्के गुणांच्या आधारे विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश (Professional Admission) दिला जाईल असे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी सांगितले. पुण्यातील विविध शैक्षणिक संस्थांना भेटी देऊन उदय सामंत (Uday Samant) यांनी स्वायत्ता महाविद्यालयांच्या संस्थाचालकांचे प्रश्न जाणून घेतले. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

 

उदय सामंत (Uday Samant) म्हणाले, व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी घेतल्या जाणाऱ्या सीईटी परीक्षेची संख्या कमी करण्यासंदर्भात शासनस्तरावर विचार सुरु आहे. इयत्ता बारावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचे प्रमाण कमी आहे. यामुळे पुढील शैक्षणिक वर्षापासून (Academic Year) व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी बारावीच्या गुणांना 50 टक्के महत्त्व दिले जाईल. सध्या सीईटी परीक्षेत प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात आहे. मात्र पुढील वर्षी सीईटीच्या 50 टक्के गुण प्रवेशासाठी ग्राह्य धरले जातील. तसेच ज्या विद्यार्थ्याला सीईटीमध्ये कमी गुण मिळाले, असे वाटत असल्यास त्यांच्यासाठी 8 ते 10 दिवसांनंतर आणखी एक परीक्षा घेतली जाईल.

काही वर्षापूर्वी महाराष्ट्रासह इतर काही राज्यात इयत्ता बारावी व सीईटी या दोन्ही गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिला जात होता. मात्र याबाबत सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) याचिका दाखल करण्यात आली होती. एचएससी (HSC),
बीएससीई (BScE), आयसीएसई (ICSE Board) या बोर्डाच्या विद्यार्थ्यांना बारावीत मिळालेले गुण समान पातळीवर
आणण्याचे कोणतेही अचूक सूत्र अस्तित्वात नाही. यामुळे सीबीएसई (CBSE), आयसीएसई बोर्डाच्या (ICSE Board)
बारावीच्या विद्यार्थ्यांचे गुण आणि राज्य मंडळाच्या (State Board) विद्यार्थ्यांचे गुण एक समान पातळीवर आणणे अशक्य असल्याचे दिसून आले.
त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने केवळ सीईटी परीक्षेच्या आधारे प्रवेश देण्याचे आदेश दिले.

Web Title :- Uday Samant | maharashtra minister uday samant said will accept 50 percent marks of 12th standard for professional admission

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा