Uday Samant | आमदार उदय सामंत हल्ला प्रकरणी शिवसेनेच्या ६ जणांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Uday Samant | युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या सभेनंतर शिवसैनिकांनी माजी मंत्री आणि शिंदे गटाचे आमदार उदय सामंत (Uday Samant) यांच्या गाडीवर दगड, बाटल्या, चपला फेकून त्यांच्या गाडीची काच फोडली होती. या प्रकरणी पोलिसांनी ६ जणांवर गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

 

त्यात सभेचे मुख्य आयोजक संभाजी थोरवे (Sambhaji Thorve), शिवसेनेचे शहराध्यक्ष संजय मोरे (Sanjay More), राजेश पळसकर (Rajesh Palaskar), चंदन साळुंके (Chandan Solunke), सुरज लोखंडे (Suraj Lokhande), रुपेश पवार (Rupesh Pawar) यांना अटक (Arrest) करण्यात आली आहे.

 

आदित्य ठाकरे यांची कात्रज (Katraj) चौकात सभा होती. त्याचवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे कात्रज चौकात असलेल्या आमदार तानाजी सावंत (Tanaji Savant) यांच्या निवासस्थानी आले होते.
त्यांच्याबरोबर उदय सामंत तसेच अनेक नेते होते.
चव्हाण यांच्या घरातून मुख्यमंत्री शिंदे हे स्वारगेट जवळील शंकर महाराज मठात जाणार होते.
त्याचवेळी आदित्य ठाकरे यांनी आपला मुंबईला जाण्याचा बेत बदलून शंकर महाराज मठात जाण्याचा निर्णय घेतला.
त्यामुळे पोलिसांनी कात्रजकडून स्वारगेटकडे जाणारा रस्ता मोकळा केला होता.
त्याचवेळी उदय सामंत (Uday Samant) हे मुंबई बाय पासला जाण्यासाठी कात्रज चौकात आले. त्यावेळी नुकतीच सभा संपलेली होती.
एका बाजूला मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरे यांच्या गाड्यांना वाट करुन देण्यासाठी पोलीस रस्ता मोकळा करीत असताना उदय सामंत यांची विरुद्ध दिशेने आलेली गाडी नेमकी शिवसैनिकांच्या गराड्यात सापडली.
बंडखोरांची गाडी पाहिल्यावर शिवसैनिकांनी गाडीवर बाटल्या, चपला, दगडांचा मारा केला.
त्यात गाडीची मागची काच फुटली त्याचवेळी तेथे बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी त्यांच्या गाडीला मोकळी वाट करुन दिली.
तेथून ते कोथरुड पोलीस ठाण्यात आले तेथे त्यांनी तक्रार दाखल केली आहे.

दरम्यान, या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा पोलिसांनी दाखल करुन अटक केल्याचे ट्विट शिवसेनेचे शहराध्यक्ष संजय मोरे यांनी केले आहे.

 

 

Web Title : – Uday Samant | shiv sena 6 people arrested in mla udaya samant attack case

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा