उदयनराजे इज बॅक ! भाजपनं दिली ‘ही’ मोठी जबाबदारी

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – एकीकडे राज्यात सत्ता स्थापनेचे पेच कायम असताना दुसरीकडे भाजपच्या गोटातून साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्यासाठी दिलासा देणारी बातमी समोर येत आहे. भाजपकडून उदयनराजे भोसले यांना मंत्रीपदाची ऑफर दिली असल्याची माहिती खात्रीलायक सुत्राकडून मिळत आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या तीन महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला. उदयनराजे यांनी भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्या उपस्थितीत दिल्ली येथे झालेल्या सोहळ्यात भाजपमध्ये प्रवेश केला. परंतु, सातारा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते श्रीनीवास पाटील यांनी त्यांचा पराभव केला. त्यामुळे उदयनराजे भोसले यांच्या पराभवामुळे भाजपला धक्का बसला होता.

लोकसभा पोटनिवडणुकीच्या पराभवानंतर त्यांच्यावर अन्याय होऊ देणार नाही. पक्षसंघटना त्यांची योग्य काळजी घेईल असे भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते. आता उदयनराजे यांना राज्यसभेवर खासदार म्हणून पाठवले जाणार असून यावर निर्णय झाला असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. तसेच राज्यात सत्ता संघर्षामुळे शिवसेना एनडीएतून बाहेर पडली आहे. एनडीएतून बाहेर पडत असताना अरविंद सावंत यांनी अवजड खात्याचा राजीनामा दिला होता. आता अरविंद सावत यांच्या जागी उदयनराजे यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.

Visit :  Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like