शिवरायांचे वारस उदयनराजेंना लोकसभेतून बेवारस करण्याच्या हालचाली : रावते

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन 

साताऱ्यात छत्रपती शिवरायांच्या घराण्याचा वारस लोकसभेतून बेवारस करण्याच्या हालचाली सुरू असून त्यास विरोध करत सातारा लोकसभा मतदार संघातून छत्रपतींचे वारस असलेले खासदार उदयनराजे भोसले यांना सर्व राजकीय पक्षांनी बिनविरोध निवडून दिले पाहिजे, असे मत परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी व्यक्त केले. रावते यांची नुकतीच शिवसेनेच्या पश्चिम महाराष्ट्र विभागाच्या संपर्क नेतेपदी निवड झाली असून या निवडीनंतर ते प्रथमच साताऱ्यात आले होते.

[amazon_link asins=’B00LZLPYHW,B00LHZW3XY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’bdf25642-ada3-11e8-8d73-35ce8a539d3e’]

साताऱ्यामध्ये शिवसेनेच्या वतीने आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात रावते बोलत होते.

रावते म्हणाले, उदयनराजे भोसले छत्रपती शिवरायांचे वारस आहेत. त्यांना खरेतर सर्वच राजकीय पक्षांनी बिनविरोध दिल्लीला पाठवायला पाहिजे. मात्र त्यांना विरोध करण्याचा व अडचणीत आणण्याचा डाव सध्या आखला जात आहे. छत्रपतींचे वारस म्हणून त्यांच्या विरोधात कोणत्याही पक्षाने उमेदवार देऊ नये. आज जरी ते राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार असले, तरी त्यांना सध्या साताऱ्यात विरोध केला जात आहे. छत्रपतींचा हा वारस बेवारस करण्याच्या हालचाली सुरू  आहेत, पण असे कधीही होणार नाही. छत्रपती शिवरायांच्या घराण्याला आपण जर मानत असू, तर त्यांचा वारस दिल्लीत पाठविलाच पाहिजे.

दापोडीत तरुणावर खुनी हल्ला

उदयनराजे यांच्याविषयीच्या रावते यांच्या वक्तव्याने मेळव्याला उपस्थित असलेले शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिकही अचंबित झाले. त्यांच्या या वक्तव्यामागे आगामी राजकीय गणिते असू शकतात, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.