छत्रपती उदयनराजे दिल्लीच्या ‘तख्ता’वर, बिनविरोधची औपचारिकताच बाकी

पोलिसनामा ऑनलाईन टीम – छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि सातार्‍याचे माजी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले पुन्हा एकदा दिल्लीचे तख्त राखण्यासाठी सज्ज झाले आहेत. भारतीय जनता पक्षाकडून त्यांना राज्यसभेवर बिनविरोधची औपचारिकता बाकी राहिली आहे.

भाजपने राज्यसभेसाठी छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या नावाची घोषणा  केली होती. महाराष्ट्रात  राज्यसभेच्या रिक्त झालेल्या सात जागांसाठी निवडणूक होणार आहे. छत्रपती राजे यांनी गुरुवारी  विधानभवनात  उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. भाजपकडून रामदास आठवले, भागवत कराड यांना संधी देण्यात आली आहे. छत्रपती उदयनराजे यांची राज्यसभेवर नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्या रुपाने तिसरा खासदार सातार्‍याला मिळणार आहे. माढा लोकसभा मतदार संघातून श्रीनिवास पाटील यांनी छत्रपती उदयनराजेंचा पराभव केला होता. त्यानंतर राज्यसभेवर राजेंना पाठविण्यासाठी भाजपने हालचाली केल्या. दरम्यान, छत्रपती उदयनराजे यांना पुन्हा खासदारपदावर नियुक्त केले जात असल्यामुळे नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.