Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंनी मानले बंडखोर आमदारांचे आभार, जाणून घ्या नेमकं काय म्हणाले

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील सत्तासंघर्षात शिवसेना (Shivsena) पक्ष केंद्रस्थानी आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखाली बहुसंख्य आमदारांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या विरोधात बंड केलं. भाजपच्या (BJP) पाठिंब्याने शिंदे मुख्यमंत्री (CM) झाले. एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदारांनी बंड केल्यामुळे शिवसेनेत निर्माण झालेल्या वादळानंतर पक्षप्रमुख (Party Chief) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज शिवसेना भवनात (Shivsena Bhavan) पत्रकार परिषद घेत जाहीरपणे आपली भूमिका मांडली. यावेळी उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचं भवितव्य काय असेल हे स्पष्ट करताना बंडखोरांवरही खोचक शब्दांत निशाणा साधला. उद्धव ठाकरेंनी यावेळी बंडखोर आमदारांचे (Rebel MLA) आभार व्यक्त केले.

 

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले, ज्यांनी बंडखोरी केली ते आजही माझ्याबद्दल आणि आदित्यबद्दल (Aditya Thackeray) प्रेम व्यक्त करत आहेत. त्यांना आजही माझ्याबद्दल प्रेम वाटत आहे. ठाकरे कुटुंबीय बद्दल आदर वाटत आहे. त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो, असे म्हणत त्यांनी हात जोडून बंडखोरांचे आभार व्यक्त केले. पण ज्यावेळी माझ्या कुटुंबीयांवर अश्लाघ्य भाषेत टीका केली गेली त्यावेळी यातला एकही जण बोलला नव्हता. तेव्हा तुमची दातखिळी बसली होती का? असा सणसणीत टोला त्यांनी बंडखोरांना लगावला.

 

आजपर्यंत गप्प असणारे तिकडे जाऊन बोलू लागलेत. ज्यांनी आजवर ठाकरे कुटुंबीयांबाबत विकृत भाषेत टीका केली त्यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसले आहात. मग तुमचं प्रेम खरं की खोटं? माझ्याबद्दल आजवर ते लोक जे बोलले ते तुम्हाला लखलाभ, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरेंच्या भाषणातील 8 मुद्दे

1. शिवसेनेच्या चिन्हाबद्दल (Symbol) चर्चा सुरु आहे. कायद्यानुसार धनुष्यबाण शिवसेनेपासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. माणसं आहेत तोपर्यंत शिवसेना संपणार नाही. कट्टर शिवसैनिक आहेत तोपर्यंत पक्षाच्या भवितव्याला धोका नाही. शिवसेनेनं साध्या माणसाला मोठं केलं.

 

2. 15 ते 16 आमदार आमच्यासोबत आहेत. त्यांचे मला कौतुक आहे. अशी जिगरीची माणसं जिथं असतात तिथं विजय हमखास असतो.

 

3. सगळे आमदार गेले, तरी पक्ष अस्तित्वात असतो. शिवसैनिकांनी संभ्रम मनात ठेवू नये. माझा न्यायदेवतेवर विश्वास आहे. येत्या 12 तारखेला सुनावणीचा निकाल येईल तो शिवसेनेच्या भविष्याचा निकाल असेल. पण या केसमुळे देशात लोकशाहीचं भविष्य किती काळ मजबूत राहणार आहे. आंबेडकरांच्या घटनेनुसार कारभार होणार आहे का हे सांगणारा हा निकाल असेल.

 

4. अडीच वर्षापूर्वी हेच केलं असतं, तर सन्मानाने झालं असतं. मला वादविवाद होऊ द्यायचा नाही. माझ्याकडून मी शांतपणाने सांगतोय. मी सध्या प्रश्नांना उत्तरं देणार नाही.

 

5. मी आजही म्हणतो हिंमत असेल तर पुन्हा निवडणुका घ्या. मध्यावर्ती निवडणूक (Midterm Election) व्हायला हवी. मी चुकलो असेल तर जनता मला घरी बसवेल.

 

6. सामान्य लोकांना शिवसेनेनं मोठं केलं याचा मला अभिमान आहे. जे लोक मोठे झाले ते गेले.
त्यांना जाऊ द्या. आजही अनेक जण शिवसेनेसोबत आहेत.

 

7. कितीही आमदार जाऊ द्या पक्ष आपलाच राहील. पक्षसंघटन आणि विधिमंडळ हे वेगळं असतं.

 

8. राष्ट्रपतीच्या निवडणुकीत (Presidential Election) द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांना पाठिंबा द्यायचा की नाही हे खासदारांसोबत बोलून ठरवेन.

 

Web Title :- Uddhav Thackeray | Former CM and shivsena chief uddhav thackeray thanked the rebel mla in press conference here

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | घटस्फोटाच्या केससाठी अकाऊटंटला हाताशी धरुन सासर्‍याने मिळविली जावयाच्या उत्पन्नाची माहिती

 

Former Mumbai CP Sanjay Pandey | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्यावर CBI कडून गुन्हा नोंद

 

Deepak Kesarkar | दिपक केसरकरांचं मोठं विधान; म्हणाले – ‘वेळ गेलेली नाही, उद्धव ठाकरे भाजपाच्या वरिष्ठांशी बोलले तर…’