CM उद्धव ठाकरेंनी काढलेल्या ‘त्या’ 2 फोटोला काही वेळातच हजारो ‘लाईक्स’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – उत्तम फोटोग्राफर अशी ओळख असलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर फोनमध्ये काढलेला फोटो शेअर केले आहे. उद्धव ठाकरे आपल्या इन्स्टाग्रामवर नेहमी ऍक्टिव्ह असतात. दोन दिवसांपूर्वी 26 डिसेंबरला उद्धव ठाकरेंनी दोन फोटो शेअर करत आयफोनमधून फोटो काढल्याचे म्हटले आहे. उद्धव ठाकरेंचे गडकिल्ल्यांचे फोटो विशेष प्रसिद्ध आहेत. हेलिकॉप्टरमधून त्यांची फोटोग्राफी सर्वांना माहिती आहे.

उद्धव ठाकरेंना पहिल्यापासून फोटोग्राफीची आवड आहे. नेहमीच इन्स्टाग्रावर ते आपले फोटो पोस्ट करत असतात. त्यांना इन्स्टाग्रामवर ७५ हजार लाईक्स आहेत. दोन दिवसांपूर्वी त्यांनी निसर्गाचे दोन फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोत सुंदर अशी फुलं दिसत आहेत. झाडाच्या मागे उगवत्या सूर्याची किरणं दिसत आहेत. दुसरा फोटोही मिळता जुळता आहे पण त्यात फोकस उगवत्या सूर्यावर केला आहे.

यामुळे त्यांच्यातील फोटोग्राफर अजूनही जिंवत असल्याचे दिसत आहे. त्यांच्या या फोटोंचे स्टनिंग असे म्हणत कौतुक करण्यात येत असून, या फोटोंना हजारो लाईक्स मिळत आहेत. यावरून याचा राजकारणाशी संबंध जोडला जात आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/