Uddhav Thackeray-Sharad Pawar | CM उद्धव ठाकरे आणि शरद पवारांबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट; शिवसैनिकांनी एकास चोपले

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – Uddhav Thackeray-Sharad Pawar | गेल्या काही दिवसांपुर्वी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये (Mahavikas Aghadi Government) सामील होण्यासाठी राष्ट्रवादीला (NCP) युतीची ऑफर दिल्यामुळे महाराष्ट्रात एकच गोंधळ निर्माण झाला. या विषयावरुन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Uddhav Thackeray-Sharad Pawar) यांच्याबद्दल फेसबुकवर अत्यंत अश्लिल पोस्ट शेअर करणाऱ्या एका व्यक्तीला शिवसैनिकांनी (Shivsainik) भर चौकात चांगलाच धुतला आहे. दरम्यान या घटनेचा व्हिडीओ (Video) समाज माध्यमांवर चांगलाच प्रसारित झाला आहे.

 

याच युतीच्या चर्चेवरून भाजपने (BJP) शिवसेनेच्या (Shiv Sena) हिंदुत्वावर सवाल उपस्थित करत टीका केली होती. या दरम्यान महाराष्ट्रात चर्चेला उधाण आलं आहे. मात्र, शिवसेना आणि राष्ट्रवादीने एमआयएमची (MIM) ऑफर साफ धुडकावून लावली होती. पण, जळगाव जिल्ह्यातील (Jalgaon News) यावल तालुक्यात राहणाऱ्या एका व्यक्तीने मुख्यमंत्री ठाकरे आणि शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट फेसबुकवर शेअर केली होती. या पोस्टमुळे शिवसैनिक चांगलेच भडकले. त्यानंतर शिवसैनिकांनी संबधित व्यक्तीचे घर गाठून त्याला चौकात घेऊन आले. त्यानंतर संतापलेल्या शिवसैनिकांनी त्या व्यक्तीला बेदम मार दिला. (Uddhav Thackeray-Sharad Pawar)

 

दरम्यान, संतापलेल्या शिवसैनिकांना बघून संबंधित व्यक्तीने हात जोडून माफी मागितली.
त्याचबरोबर इथून पुढे अशी पोस्ट टाकणार नाही, असं त्यानं सांगितलं. माफी मागताच हे प्रकरण मिटवण्यात आले आहे.

 

Web Title :- Uddhav Thackeray-Sharad Pawar | shiv sena activists slapped the person who posted an objectionable fb post about cm thackery

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा