Homeताज्या बातम्याUddhav Thackeray | उद्धव ठाकरेंची नवी रणनीती ? पक्ष कार्यकारिणीने घेतला...

Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंची नवी रणनीती ? पक्ष कार्यकारिणीने घेतला ‘हा’ निर्णय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेत बंडखोरी (Rebellion in Shiv Sena) झाल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्रीपदाचा (CM) राजीनामा दिला. त्यावेळी विधान परिषदेच्या (Legislative Council) सदस्यत्वाचादेखील राजीनामा (Resignation) देत असल्याचे उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधताना सांगितले होते. मात्र उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी प्रत्यक्षात विधान परिषदेच्या सभापतींकडे आमदारकीचा (MLA) राजीनामा दिला नाही. त्यानंतर राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडल्या.

 

राज्यातील राजकीय घडामोडीनंतर एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आपल्या विधान परिषदेच्या सदस्यत्वाच्या म्हणजेच आमदारकीचा राजीनामा देणार नाहीत. विधान परीषदेत शिवसेनेचं संख्याबळ कमी होऊ नये म्हणून शिवसेना पक्ष कार्यकारिणीने (Shiv Sena Party Executive Committee) हा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याबाबत एका वृत्तवाहीनीने वृत्त दिले आहे.

 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देताना आपण विधान परिषद आमदारकीचा राजीनाम्याचीही घोषणा केली.
त्यांनी त्यानुसार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांच्याकडे राजीनामा पत्र दिले.
मात्र विधान परिषद सदस्याचा राजीनामा हा विधान परिषद सभापतीकडे (Speaker of the Legislative Council) द्यावा लागतो.
त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा राजीनामा ग्राह्य धरला गेला नाही. शिवसेना पक्षप्रमुख (Shiv Sena Party Chief) उद्धव ठाकरे विधान परिषद आमदार म्हणून कार्यरत आहेत. विधान परिषदेचं संख्याबळाच्या पार्श्वभूमीवर आमदारकीचा राजीनामा न देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

 

Web Title : –  Uddhav Thackeray | shiv sena chief uddhav thackeray will not give resignation of mlc membership

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

 

 

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News