Uddhav Thackeray | ‘सभेत शिरणाऱ्याची वल्गना करणाऱ्या घुशींना बिळातून बाहेर काढून आपटणार’, उद्धव ठाकरेंचा गुलाबराव पाटलांवर घणाघात

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – जळगावातील सगळा जल्लोष आणि उत्साह पाहिल्यावर शिवसेना (Shivsena) कुणाची याची प्रचीती येते, पाकिस्तानला (Pakistan) जरी शिवसेना कुणाची विचारली तरी तो सांगेन. पण आमच्याकडे मोतीबिंदू झालेल्या निवडणूक आयोगाला (Election Commission) समजत नाही, अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केले. निवडून गेलेले गद्दार झाले, पण निवडून देणारे माझ्यासोबत असून, ज्यांनी भगव्याला कलंक लावला त्यांचे हात कायमचे काढून टाकायचे आहेत, असं उद्धव ठाकरे म्हणाले. जळगावातील पाचोरा या ठिकाणीच्या जाहीर सभेत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी चौफेर फटकेबाजी केली.

 

गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्यावर निशाणा साधताना उद्धव ठाकरे म्हणाले, काही जणांना असं वाटतंय की ते म्हणजे शिवसेना. आम्ही सभेत घुसणार असं काहीजण वल्गना करतात, पण निवडणुकीत त्यांची शेपटी आदळून त्यांची जागा दाखवावी. आज आर ओ पाटलांची (RO Patil) उणिव भासते. एक कणखर आणि विश्वासू सहकारी जाण हे परवडणारं नाही. अगदी चाळीस गद्दार जरी गेलो तरी चालतील, पण एक विश्वासू सहकारी जाणं परवडत नाही, असंही उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले.

 

अनाथांच्या नाथा झाल्या असतील…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावर टीका करताना उद्धव ठाकरे यांनी कविता सादर केली. ते म्हणाले, झाल्या असतील तुमच्या वाऱ्या तर या आमच्या बांधावर, अनाथांच्या नाथा झाल्या असतील तुमच्या वाऱ्या तर या आमच्या बांधावरती. तुमचं सगळं चाललं असेल ओकेमधी, माझ्या कापसाला भाव कधी येईल, अशी कविता करत त्यांनी शिंदे गटावर (Shinde Group) तोफ डागली.

पुन्हा खाली खेचण्याची वेळ आली आहे
आर ओ तात्या यांनी वैशाली ताई यांची जी ओळख त्यावेळी सांगितली तेव्हा कळलं नव्हतं. पण आज वैशाली ताई यांनी ती ओळख दाखवून दिली. त्यांनी एक पाकिट दाखवलं. त्यामध्ये बुरशी आहे. ती मातीत टाकली की पीक कसदार येतं. चांगलं पीक आल्यानंतरही त्याला कीड लागली तर त्याला मारण्याचं औषध ही आर ओ तात्या यांनी हातात देवून ठेवलेली आहे. कारण कसता तुम्ही, निवडणूक आल्यावर तुम्ही प्रचार करता, तुम्ही मरमर राबता, आणि हे पिकोजी वरती बसतात, त्यांना संजय राऊत (Sanjay Raut) गुलाबो गँग म्हणतात. त्यांना जस घोड्यावर चढवलं होतं तसं पुन्हा खाली खेचण्याची वेळ आली आहे. निवडुन आलेले गद्दार झाले परंतुन निवडु देणारे आही माझ्यासोबत आहेत, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

 

कलंक लावणारे हात कायमचे गाडुन टाकायचे
ज्यांनी तुमच्या निष्ठेला डाग लावला, कलंक लावला, ज्यांनी भगव्याला लावला, तो कलंक तर धुवायचा आहेच मात्र तो कलंक लावणारे हात देखील आपल्याला राजकारणात कायमचे गाडुन टाकायचे आहेत. आपलं सरकार होतं त्यावेळी कोरोनाचं संकट होतं ते काही सरकारनिर्मित संकट नव्हतं. नैसर्गिक चक्रीवादळ (Natural Cyclone) देखील येत होती. पण प्रत्येक सभेत विचारतो, तोच प्रश्न विचारतोय. ज्या ज्या वेळेस संकटं येत होती त्या त्या वेळेस सरकारची मदत मिळ होती का नव्हती? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी विचारला.

 

तर बहिणाबाईंना देखील तुरुंगात टाकलं असतं
शिंदे-फडणवीस सरकारवर (Shinde-Fadnavis Government) हल्लाबोल करताना उद्धव ठाकरे म्हणाले, हे उलट्या पायाचं सरकार हे स्वत:च एक संकट आहे. अवकाळी आलेलं सरकार आहे. गारपीट काय होतेय, अवकाळी पाऊस काय पडतोय. एका तरी संकटात त्यांनी मदत तुमच्यापर्यंत पोहोचली का? शेतकऱ्यांना पीक विम्याचे (Crop Insurance) पैसे मिळाले असतील तर सांगा. हे बोलायचं नाही, नाही तर काय करायचं? खरं बोललं तर त्याच्यामगे पोलिसांचा ससेमिरा लागतो. पोलिसांना देखील सांगायचं आहे, तुम्ही देखील शेतकऱ्यांची मुलं आहात. शेतकऱ्याने त्याच्या व्यथा शब्दांकन करुन टाहो फोडला तर त्याला तुम्ही अटक करणार? आज जर खान्देशच्या बहिणाबाई (Bahinabai Chaudhari) असत्या तर त्यांना सुद्धा या नतभ्रष्ट सरकारने तुरुंगात टाकायला कमी केलं नसतं, अशा शब्दात त्यांनी सरकारवर घणाघात केला.

 

ही रक्त पिऊन ठसठशीत फुगलेली ढेकणं
आईच्या कुशीवर वार करणारी अवलाद तुम्ही असु शकत नाही. ढेकणं मारायला तोफेची गरज नसते.
पण ही साधीसुधी ढेकणं नाहीत, तुमचं रक्त पिऊन ठसठशीत फुगलेली ही ढेकणं आहेत. ही ढेकणं मारायला एक बोट पुरेसं आहे.
काहीही माझ्याकडे नसताना तुम्ही आलात याचं मला आश्चर्य वाटतं. तुम्ही आलात कारण तुम्ही घेणारे नाही तर आशिर्वाद देणारे आहात.
दोन पाच इकडे तिकडे गेले असतील पण हे लाखो करोडो हात माझ्यासोबत आहेत,
कुणाची हिंमत आहे माझा केस देखील वाकडा करण्याची, येऊन दाखवा, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिले.

 

सत्यपाल यांच्या मागे सीबीआय लावली
सत्यपाल मलिक (Satyapal Malik) यांनी महत्त्वाची माहिती दिली,
पुलवामा हत्याकांडात (Pulwama Attack) आपले 40 जवान शहीद झाले,
ती पूर्ण चूक आपल्या केंद्रीय गृह मंत्रालयाची होती, त्यांनी त्या जवानांना पुरेशी सुरक्षा दिली
नाहीच पण विमाने द्यायला हवी होती ती विमाने दिली नाहीत, म्हणून त्यांचे जीव गेले.
सत्यपाल मलिक काश्मीरमधून 370 कलम हटविण्याबद्दलही बोलले आहेत,
कोण उत्तर देतंय? उत्तर देणे दूरच, त्यांच्या मागे सीबीआय (CBI) लावली.

काल तर कहरच झाला, दोन-तीन दिवसांपूर्वी देखील जवान मारले गेले.
तरी देखील आपले सर्व मंत्री जणु काही देशासमोर सर्व प्रश्न संपलेले आहेत,
आम्हाला कर्नाटकची निवडणूक (Karnataka Elections) महत्त्वाची आहे म्हणून कर्नाटकात ठाण मांडुन बसले आहेत,
अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्र्यांवर केली.

 

Web Title :- Uddhav Thackeray | shivsena uddhav thackeray jalgaon sabha live speech pachora sabha gulabrao patil bjp uddhav thackeray sabha

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Nashik ACB Trap | नाशिक अ‍ॅन्टी करप्शन ब्युरो : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग – सिन्नर नगरपरिषदेच्या मुख्याधिकार्‍याविरूध्द लाच प्रकरणी गुन्हा

Ajit Pawar | तिसरे अपत्य असणाऱ्या खासदार-आमदारांना अपात्र करा, अजित पवारांची केंद्राकडे मागणी

Pune News | पुणे : कृषि विभागामार्फत ‘जत्रा शासकीय योजनांची- सर्व सामान्यांच्या विकासाची’ अभियान राबविण्यात येणार