‘अब की बार ठाकरे सरकार’ ! ‘हे’ दिग्गज नेते देखील आजच मंत्रिपदाची शपथ घेणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महिन्याभराच्या सत्तानाट्यानंतर अखेर राज्यात सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे. संध्याकाळी ६ वाजून ४० मिनिटांनी शिवतीर्थावर हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. शपथ विधीसाठी शिवराज्याभिषेक ही थीम करण्यात आलेली आहे. उद्धव ठाकरेंसोबत यावेळी राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे देखील मंत्री शपथ घेणार आहेत.

२० वर्षांनंतर महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री विराजमान होणार आहे. तसंच उद्धव ठाकरे हे राज्याचे २९ वे मुख्यमंत्री असतील. शिवाजी पार्कमध्ये 30 हजार खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आलीय. दादार परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त करण्यात आला आहे. राष्ट्रवादीतून नाराज असलेले अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली जाऊ शकते तर काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाण यांची विधानसभा अध्यक्ष पदी नियुक्ती केली जाऊ शकते. काँग्रेसला सुद्धा उपमुख्यमंत्रीपद हवे आहे मात्र अद्याप त्यावर एकमत होऊ शकलेले नाही अशी माहिती मिळतीय.

उद्धव ठाकरेंसोबत हे नेते घेणार मंत्री पदाची शपथ
एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, सुनील प्रभू, अनिल परब, दीपक केसरकर, गुलाबराव पाटिल, संजय राठोड, आशीष जायसवाल, गोपीकिशन बाजोरिया, तानाजी सावंत, उदय सामंत शिवसेनेचे हे आमदार मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून जयंत पाटिल, छगन भुजबळ, दिलीप वलसे पाटिल, हसन मुश्रिफ़, राजेश टोपे, नवाब मलिक, अनिल देशमुख, धनंजय मुंडे, जितेंद्र अव्हाड मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे.

काँग्रेसकडून अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, सतेज पाटील, अमित देशमुख, बालासाहेब थोरात, के सी पड़वी, सुनील केदार, नितीन राऊत, यशोमती ठाकूर, विश्वजीत कदम, नाना पटोले, वर्षा गायकवाड़ ह्या मंत्र्यांची नाव चर्चेत आहेत.

हे मान्यवर राहणार उपस्थित
उद्धव ठाकरे यांनी स्वतः फोनवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शपथ सोहळ्यासाठी निमंत्रण दिले आहे. तसेच केंद्रातील इतर नेत्यांनादेखील निमंत्रित करण्यात आलेले आहे. या अभूतपूर्व सोहळ्यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, एच डी देवेगौडा, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमनाथ, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, पंजबचे कॅप्टन अमरेंद्र सिंह, ममता बॅनर्जी तसेच इतर राज्यातील अनेक दिग्गज नेते हजार राहणार आहेत.

कसे असेल मंत्रिमंडळ
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिवसेनेकडे मुख्यमंत्री आणि 11 मंत्रिपदं असणार आहे. तसंच 4 राज्यमंत्रिपदही असणार आहे. राष्ट्रवादीकडे उपमुख्यमंत्रिपद आणि 12 महत्त्वाची खाती असणार आहे. तसंच 4 कॅबिनेटपदही मिळणार आहे. काँग्रेसकडे विधानसभेचं अध्यक्षपद आणि 10 महत्त्वाची खाती असणार आहे. तसंच 2 राज्यमंत्रिपदही असणार आहे.

Visit : Policenama.com