शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंनी नुकतेच मंत्री झालेल्या तानाजी सावंत यांना झाप-झाप झापले !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सध्या महाराष्ट्रभरात खेकडा या प्राण्याची जोरात चर्चा सुरु आहे. याला कारण आहेत नुकतेच मंत्री झालेले शिवसेनेचे तानाजी सावंत. तिवरे धरण खेकड्यांमुळे फुटले असे अजब तर्कट जलसंधारणमंत्री तानाजी सावंत यांनी लावले. यामुळे शिवसेनेची चांगलीच गोची झाली. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन तानाजी सावंत यांना फोनवरून चांगलेच झापल्याची माहिती आता समोर येत आहे. त्यांनी फोनवरून सावंत यांची कानउघाडणी करत तोंडावर लगाम लावण्यास सांगितले आहे.

नुकत्याच झालेल्या अधिवेशनात विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर जलयुक्त शिवार योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता. यावर उत्तर देताना जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी जलयुक्त शिवार योजनेत भ्रष्टाचार झाल्याची कबुली दिली होती. यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांची चांगलीच गोची झाली होती. विधासभा निवडणुकीच्या तोंडावर अशाप्रकारची वादग्रस्त विधाने शिवसेनेला परवडणारी नाहीत. कोकण हा शिवसेनेचा गड मानला जातो. त्याच कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात तिवरे हे धरण येते.

आरोग्यविषयक वृत्त

‘हे’ आहेत सॅलडचे ९ प्रकार, ‘कमजोरी’ दूर होऊन तब्येत होईल ठणठणीत

पालकाच्या भाजीचा रसही आहे ‘आरोग्यवर्धक’

डोळ्यातून सतत येणाऱ्या पाण्यासाठी करा ‘हे’ उपाय

पावसाळ्यात ‘मेकअप’ करताना ‘या’ गोष्टींची काळजी घ्या

तुमच्या ‘आयब्रो’ चा रंग अधिक डार्क करण्यासाठी वापरा ‘या’ टिप्स

‘गुळ’ या आजारांवर ठेवतो नियंत्रण

‘या’ पाच ‘फळा’चे सेवन केल्यानंतर ‘निद्रानाश’ होईल दूर