Aadhaar Card ची ही सर्व्हिस झाली बंद, जाणून घ्या UIDAI नं असं का केलं, आता तुमच्याकडे काय आहे मार्ग

नवी दिल्ली : युआयडीएआयने आता आधारशी संबंधीत एक सेवा बंद केली आहे. यापूर्वी आधार कार्ड (Aadhaar Card) हरवले, खराब झाले किंवा फाटले तर युआयडीएआयच्या वेबसाइटवर जाऊन नवीन आधार कार्डसाठी (Aadhaar Card) रिप्रिंटची ऑर्डर देऊन आपल्या रजिस्टर पत्त्यावर मागवू शकत होतात. यासाठी तुम्हाला 50 रुपये शुल्क सुद्धा द्यावे लागत होते आता असे होणार नाही, कारण ही सेवा आता बंद करण्यात आली आहे.

आता मिळणार पीव्हीसी आधार कार्ड
जुने मोठे कागदावरील आधार कार्ड आता युआयडीएआयने बंद केले आहे. त्याऐवजी आता पीव्हीसी आधार कार्ड (PVC Aadhaar card) मिळणार आहे. यासाठी जर तुम्हाला नवीन आधार कार्ड मागवायचे असेल तर पीव्हीसी आधार कार्डसाठी (PVC Aadhaar card)  ऑर्डर देऊ शकता. एखाद्या कामासाठी जर फिजिकल कॉपी जमा करायची असेल तर त्याची प्रिंट घेता येऊ शकते.

युआयडीएआयने काय म्हटले
एक व्यक्तिने ट्विटरवर आधार कार्ड हेल्पलाईनला प्रश्न विचारला की, मी माझे आधार लेटर रि-प्रिंट करू शकतो का? मला वेबसाइटवर कोणतेही ऑपशन दिसत नाही. यावर आधार हेल्प सेंटरने उत्तर दिले की, ही सर्व्हिस आता बंद केली आहे. तुम्ही ऑनलाइन माध्यमाने आधार पीव्हीसी कार्ड ऑर्डर करू शकता. जर तुम्हाला फ्लेक्सिबल पेपर फॉर्मेट मध्ये ठेवायचे असेल तर तुम्ही ई-आधारची प्रिंट काढु शकता.

50 रुपयात बनवा पीव्हीसी आधार कार्ड
सर्वात चांगली गोष्ट ही आहे की, तुम्ही तुमच्या मोबाइल नंबरवरून आपल्या संपूर्ण घरासाठी पीव्हीसी कार्ड (PVC Aadhaar card)  बनवू शकता.

पीव्हीसी आधार कार्डसाठी असे करा अप्लाय
1. युआयडीएआयची वेबसाइट uidai.gov.in किंवा resident.uidai.gov.in वर जा.
2. वेबसाइटवर आपला आधार कार्ड नंबर, व्हर्च्युअल आयडी नंबर किंवा रजिस्ट्रेशन नंबर टाका.
3. 50 रुपयांची फी भरून ऑर्डर करा, काही दिवसानंतर तुमच्या रजिस्टर्ड पत्त्यावर पीव्हीसी कार्ड पोहचेल.

 

Also Read This : 

 

नवाब मलिकांचे चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर; म्हणाले – ‘सरकार झोपेत निर्णय घेत नाही, तुम्ही स्वप्नातच आनंद घ्या’

 

Coronavirus in Pune : दिलासादायक ! पुण्यात गेल्या 24 तासात 921 रूग्ण ‘कोरोना’मुक्त

 

Ravishankar Prasad : ‘सोशल मीडियासाठीच्या नव्या नियमावलीमुळे लोकांनी घाबरू नये’

 

Pune : सिंहगड रोड पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या बाल लैंगिक अत्याचार प्रकरणात निवृत्त IAS अधिकारी मारूती सावंतांचा जामीन न्यायालयाने फेटाळला