‘एकदम’ फ्री मध्ये बदला Aadhaar Card वरील तुमचा पत्ता, सोपी आहे प्रक्रिया,जाणून घ्या
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आधारकार्ड (Aadhaar Card) आजकाल खूप महत्वाचे झाले आहे. काही दिवसांपूर्वीच सिमकार्ड घेण्यासाठी देखील आधार कार्डची गरज भासत होती. सध्याला ही अनिवार्यता रद्द करण्यात आली आहे, परंतु बँका, रेशन आणि स्वयंपाकाचा गॅस इत्यादींशी संबंधित अनेक कामे अद्याप आधार कार्डशिवाय होत नाहीत. त्यामुळे आपला पत्ता आधारमध्ये अचूक असणे आवश्यक आहे. अन्यथा बँक खाती उघडण्यासह अनेक कामे अवघड होतील ज्यामध्ये आधार कार्डची आवश्यकता असते आणि पत्ता दुसरीकडचाच असतो. परंतु आता हे काम सोपे झाले आहे. जाणून घेऊया आधार कार्डमधील पत्ता बदलण्याचे ऑनलाइन मार्ग…
चुटकीसरशी आपला पत्ता आधारमध्ये करा अपडेट
UIDAI ने यासंदर्भात एक व्हिडिओ जारी केला आहे. या व्हिडिओमध्ये घराचा पत्ता बदलण्याशी संबंधित माहिती देण्यात आली आहे. UIDAI ट्विट करून सांगितले की सर्वप्रथम https://uidai.gov.in/ या वेबसाइटवर जाऊन ‘Online Address Update’ वर क्लिक करा. योग्य पत्ता प्रविष्ट करा आणि समर्थन करणार्या दस्तऐवजाची कलर स्कॅन फाइल अपलोड करा. अशा पद्धतीनं चुटकीसरशी काही क्लिकमध्येच आपला पत्ता अपडेट केला जाईल.
ऑनलाइन आधार पत्ता कसा बदलायचा
स्टेप- 1 : सर्वात प्रथम UIDAI च्या वेबसाइट https://uidai.gov.in/ वर जा. येथे आपल्याला My Adhaar चे एक टॅब सापडेल. ड्रॉपडाऊनच्या दुसर्या टॅब Udate Your Aadhaar वर जाऊन त्याच्या ड्रॉपडाउन मधील तिसर्या पर्याया Update your address online वर क्लिक करा.
स्टेप- 2 : त्यावर क्लिक केल्यानंतर नवीन पृष्ठ उघडेल. येथे खाली गेल्यावर Proceed to Update Address वर क्लिक करा. पुन्हा एक नवीन पृष्ठ उघडेल.
स्टेप- 3 : या पृष्ठावर सर्वात प्रथम आपला आधार क्रमांक प्रविष्ट करा, त्यानंतर या पृष्ठावरील कॅप्चा वेरिफिकेशन करा आणि खाली दिलेल्या Send OTP वर क्लिक करा. आता आपल्या आधार नोंदणीकृत क्रमांकावर एक ओटीपी येईल. त्या ओटीपी खाली Enter OTP/TOTP च्या खाली 6 – अंकी ओटीपी प्रविष्ट करा आणि खाली Login वर क्लिक करा.
स्टेप- 4 : या पृष्ठावर आता Update Address via Address Proof, Update Address via Secred Code चा पर्याय देण्यात आला आहे. अॅड्रेस प्रूफ ऑप्शन निवडल्यावर नवीन पानावर तुम्हाला नवीन पत्त्याचा तपशील भरावा लागेल. त्यानंतर योग्य कागदपत्रांची छायाचित्रे अपलोड करावी लागतील.