‘प्रियांका गांधी, राहुल गांधी हे दोघेही ‘बहुरुपी’, राहुल गांधी मंदबुद्धीचा माणूस’ – आचार्य शेखर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  देशात 5 राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आता राजकीय स्तरावरून टीकाटिप्पणी केली जात आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्याकडून प्रचारसभा घेतल्या जात आहे. त्यानंतर आता आवाहन आखाड्याचे संत महामंडलेश्वर आचार्य शेखर यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. राहुल गांधींना त्यांनी मंदबुद्धी असे म्हटले आहे.

राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना पाकिस्तानातील मदरशांसोबत केली होती. त्यांच्या या विधानानंतर आवाहन आखाड्याचे संतांनी नाराजी व्यक्त केली. त्यावरूनच आचार्य शेखर यांनी निशाणा साधला आहे. ते म्हणाले, राहुल गाधींनी केलेली तुलना चुकीची आहे. त्यांची बुद्धी कमी आहे. ते पाकिस्तानला खुश करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळेच याप्रकारची वक्तव्ये करत आहेत. त्यामुळे माझा काँग्रेसला हाच सल्ला आहे, की त्यांनी मंदबुद्धीच्या माणसाला हटवावे आणि त्याला ब्राम्ही प्यायला द्यावी.

राहुल गांधी, प्रियांका गांधींचा उल्लेख बहुरुपी

प्रियांका गांधींनी मंदिरात जाऊन दर्शन घेतले होते. तर राहुल गांधी यांनी मदरशांसंदर्भात विधान केले होते. त्यामध्ये प्रियांका गांधी यांच्याबाबत भाष्य करताना ते म्हणाले, निवडणुकांच्या कालावधीमध्ये मत मागण्यासाठी दोघे बहुरुपी मंदिरात जात आहे. जनतेने त्यांच्यापासून सावध राहावे. हिंदू असल्याचे त्यांनी गर्वाने सांगावे. ते कधी मंदिरात जातात, कधी रुद्राक्षच्या माळा घातलात तर कधी क्रॉस घालून फिरतात. सध्या अनेक प्रकारचे बहुरुपी फिरत आहेत.

‘राहुल गांधींना मामाच्या गावी पाठवा’

राहुल गांधींना पक्षाने हटवावे. त्यांना मामाच्या गावी पाठवायला हवे किंवा उज्जैनला पाठवायला हवे. त्यांना उज्जैनला पाठवल्यास त्यांचा मेंदू तल्लख व्हावा यासाठी त्यांना ब्राम्ही पाजता येईल, असेही ते म्हणाले.