लंडन न्यायालयाचा मल्ल्याला दणका , प्रत्यार्पणाविरोधातील याचिका फेटाळली

लंडन : वृत्तसंस्था – बँकांचे हजारो कोटींचे कर्ज बुडवून परदेशात पसार झालेल्या कर्जबुडव्या विजय मल्ल्याला न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. लंडनमध्ये दाखल करण्यात आलेली प्रत्यार्पणाविरोधातली मल्ल्याची याचिका लंडन न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे आता लावकरच मल्ल्याचा भारतात येण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. लंडन न्यायालयाच्या या निर्णयामुळे भारतीय यंत्रणांना मोठे यश मिळाल्याचे बोलले जात आहे.

देशातल्या बँकांचे जवळपास ९ हजार कोटींचे कर्ज मल्ल्याने बुडवलं आहे. सध्या विजय मल्ल्याचं लंडनमध्ये वास्तव्य आहे. त्याच्या प्रत्यार्पणासाठी लंडनमधील वेस्टमिंस्टर कोर्टात सुनावणी सुरु होती.

यासाठी सीबीआय आणि सक्तवसुली संचालनालय याची एक खास टीम लंडनमध्ये गेली होती सीबीआयचे संयुक्त संचालक मनोहर यांच्या नेतृत्वाखाली पथक सर्व घटकांवर लक्ष ठेवून आहे निकाल कोर्टाचा निकाल सकारात्मक आला तर मल्ल्याला भारतात घेऊन येण्याचं काम ही टीम करणार आहे. दरम्यान सक्तवसुली संचालनालयानं मला फरार आरोपी संबोधले आहे. फरारी आरोपी या शब्दामुळे माझ्या प्रतिमेला धक्का लागला आहे त्यामुळे ‘फरारी आरोपी’ हा शब्द काढून टाकावा असे मल्ल्याने सुप्रीम कोर्टात याचिका करून मागणी केली होती

काही महिन्यांपूर्वी विजय मल्ल्याने बँकांकडे नवा प्रस्ताव पाठवला होता. त्यात त्यांना मुद्दलचे पैसे पूर्ण देतो व्याज नाही असे आश्वासन दिलं होतं, पण बँक त्याचा हा प्रस्ताव मान्य करण्याची शक्यता नाही.