आश्चर्यच ! रात्री झोपताना काही नव्हतं, सकाळी पोट दिसलं… ४५ मिनिटांत झाली आई !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एक विचित्र घटना समोर आली आहे. एक तरुणी रात्री नेहमीसारखी सामान्यपणे झोपायला गेली त्यानंतर ती जेव्हा सकाळी उठली तेव्हा तिच्या पोटाचं रुपांतर बेबी बंपमध्ये झालं होतं. त्यानंतर जे झालं ते वाचून तर तुम्हाला विश्वासही बसणार नाही. त्यानंतर केवळ ४५ मिनिटांतच तिने एका सदृढ बाळाला जन्मही दिला. धक्कादायक म्हणजे ही तरुणी केवळ १९ वर्षीय असून ती ब्रिटनची राहणारी आहे.

एम्मलुइस लेगेट असं या तरुणीचं नाव आहे. जेव्हा ती मुलगी झोपेतून उठली तेव्हा तिला काहीच सुचत नव्हते. त्यानंतर तिची आजी आणि आई तिच्यापाशी धावत आल्या. तिची आजी लुइस सांगते की,”मी जसं तिच्याकडे पाहिलं तेव्हाच मला कळंल की ती गर्भवती आहे. त्यानंतर आई आणि आजी एम्मलुइसला घेऊन रुग्णालयात गेले. पुढच्या केवळ ४५ मिनिटांत माझ्या नातीने एका मुलीला जन्म दिला. १७ जुलै २०१८ ही घटना आहे.

याबाबत बोलताना एम्मलुइस सांगते की, “हा माझ्या आयुष्यातील सर्वात धक्कादायक क्षण होता. कारमधून रुग्णालयात जात असताना मला वेदनाही होत होत्या. रुग्णालयात पोहोचल्यानंतर कारचा दरवाजा उघडताच मी बाळाला जन्म दिला. मला इतकंच आठवतं की तेव्हा मला मासिक पाळी आली नव्हती. मला वाटलं की, प्रेगनंसी पिल्समुळे असे झाले असेल. त्याशिवाय गर्भवती असण्याचे कोणतेही लक्षण मला दिसत नव्हते. मला कधी तसं काही जाणवलं देखील नाही.”

पुढे बोलताना ती म्हणते की, “माझं पोट अजिबात वाढलं नव्हतं. माझं वजन मात्र थोडं वाढलं होतं. मी माझ्या आईकडे वाढत्या वजनाची नेहमीच तक्रारही करत होते. त्यावर त्यांनी मला फिरायला जाण्याचा सल्ला दिला होता. वजन वाढलं तरी माझ्या पोटाचा भाग मात्र सामान्यच होता.” असे तिने सांगितले.

दरम्यान एम्मलुइसला याआधीही एक मुलगा आहे. तिने आता पुन्हा एकदा बाळाला जन्म देऊन ती दुसऱ्यांदा आई झाली होती. आई होतानाचा आपला आणखी एक अनुभव शेअर करताना एम्मलुइस म्हणते की, “आई होतानाचे मानसिक आणि शारिरीक बदल चांगलेच माहीत होते. पण जेव्हा कियाराचा जन्म झाला तेव्हा असं काहीच जाणवलं नाही.”

याबाबत माहिती देताना डॉक्टर म्हणाले की, “अनेकदा गर्भातील बाळ हे गर्भाशयाच्या खालच्या म्हणजेच पाठीच्या खालच्या भागात असते. त्यामुळे पोट दिसून येत नाही. दरम्यान असे होणे म्हणजे असामान्य काहीच नसून ही एक सामान्य बाब आहे.”

You might also like