शरद पवारांचा उखाणा : ‘नावाची काय बिशाद प्रतिभा माझ्या खिशात’

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाईन – शरद पवार यांनी महिलांच्या एका कार्यक्रमात त्यांच्या पत्नीच्या नावाचा उखाणा घेऊन सर्वांना अवाकच करून टाकले आहे. हा कार्यक्रम आज शनिवारी इंदापूरात पार पडला आहे. “नावाची काय बिशाद, प्रतिभा माझ्या खिशात” असा उखाणा शरद पवार यांनी इंदापुरातील कार्यक्रमात घेतला आहे.

इंदापूर बाजार समितीने शरद कृषी महोत्सवाचे आयोजन केले होते. त्यानिमित्त महिलांसाठी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले होते. त्या कार्यक्रमाला उपस्थिती राहिले असता शरद पवार यांनी उखाणा स्पर्धे बद्दल विचारणा केली त्यावर निवेदिकेने हि स्पर्धा सांयकाळच्या सत्रात असल्याचे सांगितले त्यावर शरद पवार म्हणाले, आम्हाला वाटले होते कि आमच्या समोर कोणी तरी उखाणा घेईल. असे म्हणाल्या नंतर शरद पवार यांनी निवेदिका महिलेलाच उखाणा घ्यायला लावला. त्यावर निवेदिकेने भलामोठा उखाणा घ्यायला सुरुवात केली त्यावर पटकन उखाणा घ्या अशी कमेंट शरद पवार यांनी मधेच केली तेव्हा त्या निवेदिकेने आपला उखाणा आवरता घेतला.

त्यानंतर शरद पवार यांनी व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या नेत्यांना आपण उखाणा घेणार आहे का अशी विचारणा केली. त्यावर एका उपस्थित प्रेक्षकाने उखाणा हि घेतला त्यानंतर शरद पवार यांनी उखाणा कसा साधा सरळ असावा असे म्हणत ‘नावाची काय बिशाद प्रतिभा माझ्या खिशात’ असा उखाणा घेतला. हा उखाणा घेताना शरद पवार यांनी अगदी हातवारे सुद्धा या उखाण्याला साजेसे केले आहेत.

शरद पवार यांच्या उखाण्या नंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी माईक हातात घेत म्हणले कि, हा उखाणा ऐकून बाबांना आई संध्याकाळी घरी नो एन्ट्री करेल म्हणून हा उखाणा रेकॉर्ड करू नका अन्यथा बाबांना घराबाहेर झोपावे लागेल. असे म्हणून सुप्रिया सुळे यांनी कार्यक्रमात हास्य फुलवले.