Ulhasnagar Crime | घृणास्पद ! 6 वर्षाच्या चिमुकलीवर मामाकडून बलात्कार

उल्लाहसनगर : पोलीसनामा ऑनलाइन – Ulhasnagar Crime | मागील आठवड्यात उल्हासनगर रेल्वे स्टेशन परिसरात एका अल्पवयीन मुलीचं अपहरण करुन रात्रभर बलात्कार (Minor girl kidnap and rape) केल्याची घटना उघडीस आली होती. हे प्रकरण ताजे असतानाच आता उल्हासनगरमध्ये (Ulhasnagar Crime) मामाने 6 वर्षाच्या भाचीवर बलात्कार (uncle raped 6 years old niece) केल्याची धक्कादायक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी 31 वर्षीय आरोपी मामाला बेड्या (Arrest) ठोकल्या आहेत. त्याला न्यालयात हजर केले असता त्याला 18 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी (police custody) सुनावली आहे.

पीडित 6 वर्षाची मुलगी आपल्या आई-वडिलांसोबत उल्हासनगर पुर्वेत राहते. तिचे वडील बाहेर कामाला जातात तर आई भाजी विक्री (Vegetable sale) करते. त्यामुळे दिवसभर घरात कोणी नसल्याने पीडित मुलगी जवळच राहणाऱ्या आपल्या आजोबांच्या घरी खेळायला जाते. दरम्यान 31 वर्षाच्या मामाची वाईट नजर भाचीवर पडली. त्याने आजोबांच्या घरी आलेल्या आपल्या अल्पवयीन भाचीला वासनेचा शिकार बनवलं.

13 सप्टेंबर रोजी आरोपीने पीडित मुलीवर बलात्कार केला. तिच्या वागण्यावरुन आईला संशय आला. यानंतर आईने मुलीला विश्वासात घेऊन तिच्याकडे विचारपूस केली. त्यावेळी तिने तिच्यासोबत घडलेला प्रकार आईला सांगितला. यानंतर पीडितेच्या आईने हिल लाईन पोलीस ठाण्यात (Hill Line Police Station) जाऊन आपल्या भावाविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीवर पोक्सो कायद्यांतर्गत (pocso act) गुन्हा दाखल करुन काही तासात आरोपीला अटक केली. हिललाईन पोलीस पुढील तपास करीत आहेत.

हे देखील वाचा

Anil Deshmukh | अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ ! नागपुरमधील मालमत्तांवर आयकर विभागाचा छापा

Ajit Pawar | मुख्यमंत्र्यांनी काय बोलावं हे मी कसं ठरवणार? ‘भावी सहकारी’ वक्तव्यावरुन अजित पवार म्हणाले…

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Ulhasnagar Crime | 31 years old uncle raped 6 years old niece in ulhasnagar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update