Uncontrolled Diabetes | अनियंत्रित मधुमेहामुळे ‘या’ अवयवांना होऊ शकते गंभीर नुकसान; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Uncontrolled Diabetes | मधुमेह (Diabetes) हे सध्याच्या युगात संपूर्ण जगाच्या आरोग्यापुढे मोठे आव्हान म्हणून उभा आहे. मधुमेहामुळे शरीरातील इतरही अनेक आजारांचा धोका वाढू शकतो, त्यामुळेच सर्व लोकांना या आजाराबाबत विशेष काळजी घेण्याचा सल्ला देण्यात येतो. मधुमेहावर वेळीच नियंत्रण न ठेवल्यास आणि मधुमेहाचे प्रमाण खूप जास्त झाले तर यामुळे इतर अनेक अवयवांना गंभीर इजा होण्याचा धोकाही वाढतो. ज्या लोकांच्या रक्तातील साखरेची पातळी (Blood Sugar Level) सामान्य उपायांनी नियंत्रणात राहत नाही त्यांना इन्सुलिन (Insulin) देणे आवश्यक आहे. (Uncontrolled Diabetes).

 

अनियंत्रित मधुमेहामुळे मूत्रपिंड, हृदय, रक्तवाहिन्या, डोळे, पाय, मज्जातंतू, यकृत आणि अगदी आपल्या फुफ्फुसांचे (Kidney, Heart, Blood Vessels, Eyes, Legs, Nerves, Liver, Lungs) नुकसान होऊ शकते. या समस्या टाळण्यासाठी रक्तातील साखरेचे प्रमाण नियमित तपासून त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. जर तुमच्या रक्तातील साखरेची पातळी (Uncontrolled Diabetes) सतत वाढत असेल तर याबाबत तज्ज्ञांचा सल्ला घ्या. ही परिस्थिती आपल्यासाठी खूप हानिकारक असू शकते.

 

मधुमेहामुळे किडनीचे आजार (Kidney Disease Due To Diabetes) –
मधुमेहामुळे गंभीर परिस्थितीत किडनीचे आजार (Kidney Disease) आणि किडनी निकामी (Kidney Failure) होऊ शकते. अनियंत्रित मधुमेहामुळे मूत्रपिंडातील रक्तवाहिन्यांना हानी पोहोचते. यामुळे किडनीमध्ये रक्तपुरवठा (Blood Supply) कमी होतो. त्यामुळे त्यात विषारी द्रव्ये (Toxic Liquids) वाढू लागतात. मधुमेहामुळे किडनीमध्ये क्रिएटीन्सचे प्रमाण (Creatinine Level) वाढतं. वेळीच याची काळजी घेतली नाही तर किडनी निकामी होण्याची भिती निर्माण होऊ शकते.

डोळ्यांची दृष्टी कमी होते (Low Vision) –
अनियंत्रित मधुमेहामुळे डोळ्यांची समस्या (Eye Problem) उद्भवते. मधुमेहामुळे आपल्या डोळ्यांच्या लहान रक्तवाहिन्या (Blood Vessels) खराब होऊ शकतात. यामुळे दृष्टी समस्या किंवा अंधत्व (Blindness) देखील येऊ शकते. म्हणून आपल्या रक्तातील साखरेची स्थिती आणि वेळोवेळी डोळ्यांची तपासणी नियमित मॅपिंग करणे महत्वाचे आहे.

 

मधुमेहाचा हृदयावर परिणाम (Diabetes Effects On Heart) –
रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्याने ती आपल्या रक्तवाहिन्यांत चिकटू लागते. या स्थितीत शरीराच्या इतर अवयवांसह हृदय (Heart) आणि मेंदूला (Brain) ऑक्सिजनयुक्त रक्तपुरवठा होण्यावर परिणाम होतो. मधुमेहामुळे रक्तवाहिन्यांमध्ये चरबी वाढू लागते, त्यामुळे हृदयविकाराचा झटका (Heart Attack) किंवा अर्धांगवायूचा धोकाही वाढतो.

 

दुष्परिणाम (Side Effects) –
पाय आणि बोटे काळी पडू लागतात मधुमेहींना पायांची काळजी घेण्यासाठी स्वच्छता ठेवण्याची खूप गरज असते.
मधुमेहाच्या समस्येमुळे पायांना गंभीर इजा होऊ शकते. मधुमेहामुळे पायांमधील रक्ताभिसरणावर परिणाम होतो.
परिणामी पेशी खराब होऊ लागतात. रक्तप्रवाह बिघडल्यामुळे जखम किंवा संसर्ग बरा होणेही कठीण होते.
या परिस्थितीत पाय किंवा पायाची बोटे काळी पडू लागतात, जी गंभीर अवस्थेत कापावी लागू शकतात. म्हणूनच मधुमेह नियंत्रणात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

 

Web Title :- Uncontrolled Diabetes | uncontrolled diabetes can harm your eyes and kidney tips to control diabetes

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sara Sachin Tendulkar | सारा तेंडुलकर ‘या’ विवाहित अभिनेत्यावर फिदा, अखेर तिनं सगळ्यांसमोर दिली प्रेमाची ‘कबूली’;

 

Turmeric Milk Benefits | झोपण्यापूर्वी दुधात मिसळा ‘हे’ औषध, मधुमेहापासून संसर्गापर्यंत मिळेल संरक्षण; जाणून घ्या

 

Interest Rates On PPF SSY KVP | ‘पीपीएफ’ – ‘सुकन्या समृद्धी’ सारख्या योजनांच्या व्याजदराला सुद्धा लागणार कात्री ! मोठ्या धक्क्याची तयारी