ना हिंदू, ना मुसलमान ‘या’ धर्मात सर्वात जास्त ‘बेरोजगार’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतात बेरोजगारी ही एक मोठी समस्या आहे. परंतु सरकार मात्र भारतात नोकऱ्या असल्याचे सांगत आहे. प्रत्येक निवडणुकीच्या वेळी सरकार तरुणांसाठी नोकऱ्यांचे आश्वासन देत असते, मात्र निवडणुका पार पडल्यानंतर त्यांना या आश्वासनाचा विसर पडतो. मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात बेरोजगारीचा दर मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसून आला.

मोदी सरकारच्या कार्यकाळात अल्पसंख्यांक समाजाच्या विकासाविषयी मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. त्यामध्ये मुस्लिमांविषयी जास्त चर्चा झाली. बेरोजगारी सर्वच स्तरावर पाहायला मिळत आहे. ग्रामीण असो वा शहरी सर्वच भागात मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी वाढलेली आहे. स्त्री असो किंवा पुरुष सर्वच क्षेत्रांत मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आहे.

अल्पसंख्यांक मंत्रालयाने एका प्रश्नाला उत्तर देताना पिरिऑडिक लेबर फोर्स सर्वेच्या अनुषंगाने लोकसभेत एक रिपोर्ट सादर केला. या रिपोर्टमध्ये भारतातील चार मोठे धर्म म्हणजेच हिंदू, मुस्लीम, शीख आणि इसाई या धर्मांमध्ये मोठ्या प्रमाणात बेरोजगारीच्या बाबतीत दरी दिसून येत आहे. या रिपोर्टनुसार ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात बेरोजगारीचे प्रमाण जास्त आहे. ग्रामीण भागात ५.८ टक्के पुरुषांकडे काम नाही तर ३.८ टक्के महिलांकडे काम नाही. त्याच तुलनेत शहरी भागात ७.१ टक्के पुरुषांकडे काम नाही तर १०.८ टक्के महिलांकडे काम नाही आणि ते बेरोजगार आहेत.

हिंदू कमी बेरोजगार

या सर्व्हेत केलेल्या अभ्यासानुसार हिंदू धर्मातील महिला आणि पुरुषांमध्ये इतर धर्माच्या तुलनेत कमी बेरोजगारी आहे. ग्रामीण भागात ५.७ टक्के पुरुष तर ३.५ टक्के तर शहरी भागात ६.९ टक्के पुरुष तर १० टक्के महिला बेरोजगार आहेत.

मुस्लिम आणि इसाई सर्वात जास्त बेरोजगार

या सर्व्हेत देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार हिंदू धर्मानंतर शीख धर्मात सर्वात कमी बेरोजगारी असून मुस्लिम आणि इसाई धर्मात सर्वात जास्त बेरोजगारी आहे. राष्ट्रीय सरासरीच्या खूप मोठ्या प्रमाणात ही आकडेवारी आहे.

मात्र या सगळ्यात चारही धर्मांमध्ये इसाई धर्मात बेरोजगारीचा दर हा सर्वात जास्त आहे. इसाई धर्माच्या रोजगाराची स्थिती ग्रामीण आणि शहरी या दोन्ही भागात मोठ्या प्रमाणवर आहे. शहरी भागात ८.९ टक्के पुरुष तर १५.६ टक्के महिला तसेच ग्रामीण क्षेत्रात ६.९ टक्के पुरुष तर ८.८ टक्के महिला बेरोजगार आहेत. त्याचबरोबर बेरोजगारीचे सर्वात जास्त प्रमाण हे शहरी भागात असून तरुण वर्गामध्ये बेरोजगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे.

आरोग्यविषयक वृत्त – 

परिपूर्ण ‘आहारासाठी’ खूपच काटेकोरपणा चांगला नाही

चयापचय प्रक्रिया चांगली ठेवण्यासाठी अशी घ्या काळजी

मेंदूच्या तंदुरुस्तीसाठी ‘खा’ हे पदार्थ

योग्य पद्धतीने ‘व्यायाम’ केल्यास होईल लवकर फायदा