Budget 2019 : आता ‘इन्कम’ टॅक्स रिटर्न फॉर्म भरणं झालं सोपं, जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिल्या अर्थसंकल्पात कर भरणाऱ्या लोकांना सरकारने चांगलाच दिलासा दिला आहे. कर भरणाऱ्या लोकांच्या संख्येत वाढ व्हावी यासाठी सरकार अनेक उपाययोजना करत आहे. आता इनकम टॅक्स रिटर्न भरणाऱ्या लोकांसाठी आधीच भरलेला टॅक्स फॉर्म उपलब्ध होईल. यामुळे ITR फॉर्म भरणे अधिक सोप्पे आणि जलद होईल. नागरीकांचाही वेळ आणि त्रास वाचेल. ITR भरणे अधिकाधिक सोप्पे व्हावे यासाठी उचलण्यात आलेले हे पाऊल आहे.

आता ITR फॉर्ममध्ये १ पगार, फिक्स्ड डिपॉजीटमधून मिळालेला फायदा आणि TDS डिटेल्स यांची माहिती आधीच फॉर्ममध्ये भरलेली मिळेल. या आधी ITR भरण्यासाठी ही माहिती फार्ममध्ये भरावी लागायची पण आता एकदा माहिती भरल्यानंतर पुन्हा पुन्हा ITR भरताना ही महिती भरण्याची आता गरज भासणार नाही.

फक्त ITR – १ फॉर्ममध्येच मिळणार ही सुविधा
ही सुविधा ITR फॉर्म १ भरण्यायोग्य करदात्यांनाच उपलब्ध होईल. इन्कम टॅक्स विभागाच्या ई फायलिंग वेबसाईट (www.incometaxindiaefiling.gov.in) वर जाऊन जे करदाते कर भरतात त्यांनाच या सुविधेचा लाभ घेता येईल. जर तुम्ही एक्सेल किंवा जावाच्या माध्यमातून ITR फॉर्म १ भरणाऱ्या करदात्यांना ही सुविधा उपलब्ध होणार नाही. म्हणजे त्यांना आधीची माहिती परत भरावी लागेल.

ITR – फॉर्ममध्ये उपलब्ध होणार ही माहिती

१ – पॅन, नाव, जन्म तारीख

२ – पत्ता, आधार नंबर, मोबाईल नंबर, ई-मेल आयडी

३ – टॅक्स पेमेंट, TDS आणि TCS डिटेल्स

४ – घराचा प्रकार

५ – घर मालमत्ता इन्कम

६ – डिपॉजिट, म्युचुअल फंड, शेअरमधून मिळत असलेला पैसा

७ – व्याजातून झालेला फायदा

८ – सेक्शन ८९ नुसार टॅक्स सवलत

९ – बँक अकाउंट डिटेल

पावसाळ्यात काजळाने होते इन्फेक्शन ! अशी घ्या काळजी

‘या’ १३ आरोग्य समस्यांवर आहेत ‘हे’ रामबाण उपाय

तुमचे आरोग्य उत्तम ठेवतो ‘आर्टिस्टिक योगा’

व्हिटॅमिन ‘डी’च्या कमतरतेमुळे लहान मुलांना होऊ शकतो ‘हाय बीपी’