Budget 2020 : शेतकर्‍यांसाठी ‘कुसुम’ योजना ! बजेटमध्ये मोठ्या घोषणा, सोलर पंपासाठी 60 % पैसे देणार मोदी सरकार, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आजच्या अर्थसंकल्पात कुसुम योजना कायम सुरु ठेवण्याची घोषणा केली आहे. ज्याअंतर्गत शेतकऱ्यांना सिंचनासाठी सोलर पंपाचे वाटप करण्यात येईल. यामुळे देशभरातील शेतकऱ्यांच्या सिंचनाबाबतच्या समस्या दूर होतील. कुसुम योजनेची घोषणा केंद्र सरकारच्या 2018-19 च्या अर्थसंकल्पात करण्यात आली होती. मोदी सरकार शेतकरी ऊर्जा सुरक्षा आणि महाअभियान म्हणजेच कुसूम योजना विजेच्या समस्येने त्रस्त भागांचा विचार करुन तयार करण्यात आली होती. सरकार शेतकऱ्यांना सब्सिडीच्या (अंशदान) रुपयात सोलर पंपवर एकूण किंमतीच्या 60 टक्के रक्कम देईल.

काय आहे कुसुम योजना –
देशातील शेतकऱ्यांना सिंचनाची समस्या येते. अधिक किंवा कमी पावसाने शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान होते. केंद्र सरकार कुसुम योजनेच्या माध्यमातून सोलर पंप लावून देऊन शेतात सिंचनाचा पुरवठा करुन देईल. या योजनेच्या मदतीमुळे शेतकरी आपल्या शेतात सोलर पॅनल लावून यातून तयार झालेल्या विजेचा वापर शेतात करु शकतात. शेतकऱ्यांच्या शेतात तयार होण्याऱ्या विजेने गावातील विजेच्या समस्यावर मात करता येऊ शकते.

कुसुम योजनेच्या पहिल्या टप्प्यात डिझेल पंप बदलला जाईल –
या योजनेच्या पहिल्या टप्प्यात फक्त त्या शेतकऱ्यांना सहभागी करुन घेतले जाईल जे सिंचनासाठी डिझेलच्या पंपचा वापर करतात. सरकारच्या अंदाजानुसार याअंतर्गत 17.5 लाख सिंचन पंपांना सोलर ऊर्जेवर चालवण्याची व्यवस्था केली जाईल. यामुळे डिझेलचा वापर आणि कच्च्या तेलाची आयात रोखण्यास मदत होईल.

कुसुम योजनेचे दोन फायदे –
या योजनेचे शेतकऱ्यांना दोन फायदे आहेत. एक तर त्यांना सिंचनासाठी वीज मोफत मिळेल आणि दुसरे म्हणजे अतिरिक्त वीज तयार करुन ते ग्रिडला पाठवू शकतात. त्यामुळे त्यांचे उत्पन्न देखील वाढेल. जर एखाद्या शेतकऱ्यांकडे रिकामी पडीक जमीन असेल तर त्याचा वापर सौर ऊर्जा उत्पादनासाठी केला जाऊ शकतो. त्यामुळे त्यांना पडीक जमिनीतून उत्पन्न देखील मिळेल.

विजेची होणार बचत –
सरकारच्या मते जर देशातील सर्व सिंचन पंपांसाठी सौर ऊर्जेचा वापर होत असेल तर फक्त वीजेची बचतच होणार नाही तर 28 हजार मेगावॅट अतिरिक्त वीज निर्मिती होईल. कुसुम योजनेच्या पहिल्या टप्प्यात सरकार शेतकऱ्यांच्या शेतात सोलर पॅलन लावेल आणि सौर ऊर्जा तयार करण्यास सूट देईल. या योजनेंतर्गत 10,000 मेगावॅटचे सोलर एनर्जी प्लॅंट शेतकऱ्यांच्या पडीक जमिनीवर लावले जाईल.

कुसुम योजनेच्या मुख्य बाबी –
1) सौर ऊर्जा उपकरण स्थापित करण्यासाठी शेतकऱ्यांना फक्त 10 टक्के रक्कम देण्यात येईल.
2) केंद्र सरकार शेतकऱ्यांना बँक खात्यात सब्सिडीची रक्कम देईल.
3) यासाठी हे प्लॅंट पडीक जमिनीवर लावण्यात येतील.
4) कुसुम योजनेत बँक शेतकऱ्यांना कर्जाच्या रुपात 30 टक्के रक्कम देईल.
5) सरकार शेतकऱ्यांना सब्सिडीच्या रुपात सोलर पंपाच्या एकूण रक्कमेवर 60 टक्के रक्कम देईल.