मोदी सरकारच्या कॅबिनेटच्या पहिल्याच बैठकीत ‘तीन तलाक’ विधेयकास मंजुरी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आज झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत बहुचर्चित ‘तीन तलाक’ च्या विधेयकास मंजुरी मिळाली. मोदी सरकारच्या मागच्या कार्यकाळातदेखील या मुद्द्यावरील विधेयक संसदेत मांडले गेले होते. लोकसभेमध्ये मंजूर झालेले हे विधेयक राज्यसभेमध्ये प्रलंबित होते. मागच्या १६ व्या लोकसभेचा कार्यकाळ संपल्यामुळे हे अस्थायी सभागृह बरखास्त झाले त्याबरोबरच हे विधेयक देखील समाप्त झाले.

केंद्रीय कॅबिनेटच्या मंजुरीनंतर आता १७ जूनपासून सुरु होणाऱ्या १७ व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनामध्ये हे विधेयक सादर करण्यात येईल. मागच्या वेळी राज्यसभेमध्ये सरकारकडे पुरेसे बहुमत नसल्याने विरोधी पक्षाने हे विधेयक पास होण्यापासून रोखण्यात यश मिळविले होते. त्यामुळे यावेळी विधेयकावरील राज्यसभेतील कार्यवाहीवर सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे.

काय आहे नेमका ‘तीन तलाक’ विधेयकाचा तिढा :

तीन तलाक कायदा या नावाने ओळखले जाणाऱ्या या मुस्लिम महिला (वैवाहिक अधिकार संरक्षण) विधेयकातील तरतुदींनुसार आता कोणत्याही पतीला आपल्या पत्नीला केवळ तीन वेळा तलाक, तलाक, तलाक असे उच्चारून लगेच घटस्फोट देता येणार नाही. असे करणाऱ्याला या कायद्यानुसार अपराधी मानून त्याच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल. या विधेयकातील तरतुदींवर विरोधी पक्षाने आणि मुस्लिम संघटनानी विरोध दर्शविला होता. हा कायदा म्हणजे मुस्लिम वैयक्तिक कायद्याचे उल्लंघन असल्याचे म्हणत ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डने (AIMPLB) या विधेयकाचा विरोध केला होता. मुस्लिम वैयक्तिक कायदा कुराण आणि शरियावर आधारित असून सर्वोच्च न्यायालय अथवा सरकार यामध्ये ढवळाढवळ करू शकत नाही अशी भूमिका काही मुस्लिम संघटनांची आहे.

आरोग्यविषयक वृत्त (www.arogyanama.com)

‘हा’ आहे जपानी सर्वात स्वस्त उपाय ज्याने तुम्ही ठेवू शकतात तुमचे वजन नियंत्रणात

जरा जपून, ‘या’ कारणांमुळे होऊ शकते केस गळती

‘या’ टिप्स वापरून मधुमेहावर करा नियंत्रण

डासांमुळे होणाऱ्या या आजारांना ‘घरगुती’ पद्धतीने घाला आळा.

 

Loading...
You might also like