Union Cabinet Meeting | उद्या केंद्रीय कॅबिनेटची बैठक, महागाई भत्त्याबाबत निर्णय होण्याची शक्यता

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Union Cabinet Meeting | मागील वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन (Lockdown) जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता रोखण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. परंतु आता देशातील कोरोनाची परिस्थिती सुधारत आहे. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना थकीत महागाई हप्ता मिळण्याची शक्यता आहे. केंद्रातील मोदी मंत्रिमंडळाची उद्या 11 वाजता बैठक (Union Cabinet Meeting) बोलवण्यात आली आहे. या बैठकीत महागाई भत्ता अर्थात डीए (Dearness Allowance) संदर्भात मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

DA संर्भात पुनर्विचार होण्याची शक्यता

उद्या (बुधवार) होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीचा अजेंडा अद्याप समोर आलेला नाही. परंतु देशातील कोरोना परिस्थिती सुधारत असताना केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यासंबंधी निर्णयाचा पुनर्विचार होण्याची शक्यता आहे. उद्या होणारी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडणार आहे.

थकीत रक्कम देण्याची काँग्रेसची मागणी

यापूर्वी, केंद्र सरकारचे (Central Government) कर्मचारी, सेनेचे कर्मचारी आणि
पेन्शनधारकांच्या थकीत महागाई भत्त्याची रक्कम तात्काळ देण्यात यावी. अशी मागणी काँग्रेसच्या (Congress) वतीने केंद्र सरकारकडे करण्यात आली होती.

सोशल मीडियावर पत्र व्हायरल

केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुरु करण्याचा दावा करणारं एक सोशल मीडियावर व्हायरल
झालं आहे. जुलै 2021 मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना आणि केंद्र सरकारच्या सेवानिवृत्त धारकांना
महागाई भत्ता सुरु करण्यासंबंधी कोणतेही निर्देश केंद्र सरकारकडून सुरु करण्यात आलेले नाहीत,
असं अर्थ मंत्रालयाकडून ट्विट करण्यात आलं होतं.

 देखील वाचा

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 268 नवीन रुग्ण, 226 जणांना डिस्चार्ज

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Union Cabinet Meeting will be held tomorrow at 11 am may be a big decision on da of central employees

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update