केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे 74 व्या वर्षी निधन, मुलगा चिराग ने दिली माहिती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे गुरूवारी नवी दिल्लीमध्ये निधन झाले. त्याबाबत चिराग पासवान यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. पावसान हे गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्यानं त्यांना दिल्लीतील रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. 3 ऑक्टोबर रोजी रात्री उशिरा पासावान यांच्या ह्दयाचं ऑपरेशन करण्यात आलं. रामविलास पासवान हे 74 वर्षाचे होते. सन 1969 मध्ये पहिल्यांदा ते आमदार म्हणून निवडून आले होते. सध्या मोदी सरकारमध्ये ते कॅबीनेट मंत्री होते.

5 जुलै 1946 रोजी बिहारच्या खगडियामध्ये रामविलास पासवान यांचा जन्म झाला होता. त्यांनी कोसी कॉलेज आणि पटणा युर्व्हिसिटीमधून शिक्षण पुर्ण केल्यानंतर सन 1969 मध्ये त्यांची बिहारचे डीएसपी म्हणून निवड झाली होती. त्याच साली ते संयुक्त सोशलिस्ट पार्टीतून आमदार झाले. त्यांनी राज नारायण आणि जयप्रकाश नारायण यांचं अनुकरण केलं. सन 1974 मध्ये ते पहिल्यांदा लोकदलचे महासचिव बनले. पासवान हे राज नारायण, कर्पूरी ठाकुर आणि सत्येंद्र नारायण सिन्हा यांच्यासारख्या दिग्गजांच्या जवळचे होते.

पासवान यांचे 2 लग्न झाले होते. पहिली पत्नी राजकुमारी देवी यांच्यासोबत त्यांचं नातं 1969 ते 1981 दरम्यान होतं. सन 1982 मध्ये त्यांनी रीना शर्मा यांच्यासोबत लग्न केले. पासवान यांच्या कुटुंबामध्ये त्यांच्या पत्नी शिवाय 2 मुली उषा आणि आशा पासवान तसेच मुलगा चिराग पासवान आहे. रामविलास पासवान यांचं वयाच्या 74 व्या वर्षी आज (गुरूवार) निधन झालं आहे.