देश टिळा -टोपीवर चालत नाही, नक्वींची राहुल गांधींवर जोरदार टीका

भोपाळ : वृत्तसंस्था

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींवर केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी निशाणा साधला आहे. राहुल गांधी काँग्रेस अध्यक्ष कधी टिळा लावून घेतील, कधी टोपी घालतील. पण देश टिळा आणि टोपीच्या राजकारणावर चालत नाही, असा टोला नक्वी यांनी राहुल गांधींना लगावला आहे.

मध्य प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीच्या अनौपचारिक प्रचारासाठी राहुल गांधी हे सोमवारी भोपाळला आले. या दौऱ्यात ते राज्यभरातून आलेल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर ते लालघाटी चौकातून बीएचईएल दसरा मैदानपर्यंत संकल्प यात्रेत सहभागी होणार आहेत.

[amazon_link asins=’B01K2FIQD0,B07DC5QRHN’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f6c61459-ba70-11e8-8d00-d31227d30de6′]

राहुल गांधींची सध्याची जी कार्यशैली आहे. ती भाजपाची कधीच राहिलेली नाही. मंदिर, मशीद, गुरूद्वारा हे श्रद्धेचे केंद्र असून ते राजकारणाचा केंद्र नसल्याचे नक्वी यांनी म्हटले. त्यामुळे राहुल गांधींनी आपले कार्यक्रम आपले धोरण सांगायला हंव. सध्या ते भ्रमीत आहेत, असंही नक्वी म्हणाले.

दरम्यान, राष्ट्रीय स्वंयसेवक संघात समन्वय आणि संवादाचे संस्कार आहेत. या संवाद आणि संस्कृती संस्कारमुळेच त्यांनी आपल्या मंचावर विविध विचारसरणीच्या लोकांना बोलावले आहे. असंही त्यांनी सांगीतलंट.

भाजपला मोठा धक्का: 30 आमदार काँग्रेसच्या संपर्कात