रामदास आठवले ‘कोरोना’मुक्त, उद्या डिस्चार्ज मिळणार

पोलीसनामा ऑनलाईन : – रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी कोरोनावर (union-minister-of-state-ramdas-athawale-defeated-corona) यशस्वीरित्या मात केली असून, त्यांची प्रकृती चांगली झाली आहे. रविवारी (दि.8) सकाळी 11 वाजता त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे.

देशात करोनाने शिरकाव केल्यानंतर 20 फेब्रुवारी रोजी रामदास आठवले यांनी गो कोरोना चा नारा दिला होता. मात्र त्यांनाच कोरोनाने गाठले होते. दि. 27 ऑक्टोबर रोजी त्यांचा कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. तेंव्हा पासून ते खासगी रुग्णालयात दाखल होते. 11 दिवस उपचार घेतल्यानंतर घेत आठवले यांनी करोनावर मात केली आहे. उद्या ते बांद्रा येथील संविधान या त्यांच्या निवासस्थानी परतणार आहेत. आठवले यांनी कोरोनावर मात केल्याबद्दल रिपाइं कार्यकर्ते आनंदोत्सव साजरा करणार आहेत. तसेच त्यांचे अभिनंदन व स्वागत करणार असल्याची माहिती रिपाइंचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे यांनी दिली आहे.