Union Minister Raosaheb Danve । संजय राऊतांचं रावसाहेब दानवे यांना प्रत्युत्तर; म्हणाले – ‘आमच्याकडे चावी होती म्हणून सत्तेचं टाळं उघडलं’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपचे (BJP) नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Union Minister Raosaheb Danve) यांनी एका मुलाखती दरम्यान शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (shiv sena mp Sanjay Raut) यांच्यावर निशाणा साधला होता. त्यावरून आता संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रत्युत्तर दिल आहे. ‘दोन वर्षापूर्वी आमच्याकडे चावी होती म्हणून सत्तेचं टाळं उघडलं आणि शिवसेनेला सत्ता मिळाली, तसेच भाजपच्या सत्तेला टाळं लागलं, अशा शब्दात संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मंत्री रावसाहेब दानवे (Union Minister Raosaheb Danve) यांच्यावर पलटवार केला आहे. त्यावेळी संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज (बुधवार) मुंबईत माध्यमांशी संवाद साधला.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) हे एका मुलाखती दरम्यान (मंगळवारी) सवांद साधत होते. त्यावेळी त्यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांना टोला लगावला आहे. त्यावेळी ते म्हणाले होते, ‘संजय राऊत हे चावी दिल्याशिवाय बोलत नाहीत, त्यांना कुणीतरी चावी देतं आणि मग ते केंद्र सरकार विरोधात टीका करतात, असा निशाणा मंत्री दानवेंनी संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर साधला होता. याच मुद्यावरून संजय राऊत (Sanjay Raut) हे रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांना प्रत्युत्तर दिले आहे. राऊत म्हणाले, ‘रावसाहेब दानवे हे आमचे चांगले मित्र आहेत, कधी कधी ते विनोद करतात. त्या विनोदी शैलीचे मी कौतुक करतो, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

 

रावसाहेब दानवे काय म्हणाले होते?

मागील काही दिवसापासून संजय राऊत (Sanjay Raut) सातत्याने केंद्र सरकारवर टीका करत आहेत.
मात्र, त्यांचा बोलविता धनी वेगळाच आहे.
तसेच, संजय राऊत यांना चावी दिली की ते बोलतात पण आता लोक संजय राऊतांना गांभीर्याने घेत नाहीत.
अशा शब्दात जोरदार निशाणा रावसाहेब दानवे यांनी संजय राऊत यांच्यावर साधला होता.

Wab Title :- Union Minister Raosaheb Danve | shiv sena mp sanjay raut s reply to union mos raosaheb danve said we had the key so the lock of power was opened

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Karnala Bank Scam | कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणी शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांना ED कडून अटक

MP Chhatrapati Sambhaji Raje । संभाजीराजेंचा चंद्रकांत पाटलांवर पलटवार; म्हणाले – ‘खासदारकी मागायला मी भाजपाकडे गेलो नव्हतो’

Vaccination Scam | मुंबईतील हाऊसिंग सोसायटीत बोगस लसीकरण; 390 जणांकडून घेतले प्रत्येकी 1260 रुपये