स्मृती इराणींच्या खासदार निधीत घोटाळा ; न्यायालयात झाले सिद्ध 

अहमदाबाद : गुजरात वृत्तसंस्था – केंद्रीय मंत्री यांनी गुजरात राज्यातून राज्यसभेच्या सदस्या असणाऱ्या स्मृती इराणी यांच्या खासदार निधीत घोटाळा झाला आहे. यासंदर्भात गुजरात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे . गुरुवारी सुनावणी दरम्यान खासदार निधीच्या संबंधित संस्थेकडून विकासासाठी खर्च झालेली रक्कम वसूल करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

कॅगच्या अहवालातून स्मृती इराणी यांच्या खासदार निधीतून करण्यात आलेल्या विकासकामात घोटाळा झाल्याचे उघड झाले होते. या गंभीर खुलाश्या नंतर काँग्रेसच्या आमदाराने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यासंदर्भात काल उच्च न्यायालयात सुनावणी घेण्यात आली होती.

कॅगच्या अहवालात घोटाळा उघड झाला तरी संबधीतांवर कार्यवाही न झाल्याने काँग्रेस आमदाराने हि जनहित याचिका दाखल केली होती. संबंधित संस्थेकडून लवकरात लवकर निधी वसूल करण्यात यावा असे निर्देश  न्यायालयाने दिल्याने निवडणुकीच्या तोंडावर भाजपला चांगलाच झटका बसला आहे. या खटल्याची सुनावणी २६ मार्च रोजी होणार आहे.

दरम्यान स्मृती इराणी यांनी संबधित संस्थांना ५.९३ कोटी रुपये विना निविदा दिले आल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. त्यामुळे गांधी घराण्याच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे समोर आणणाऱ्या स्मृती इराणींचेच हात दगडाखाली सापडले आहेत.