अमेरिकेतील परिस्थिती चिंताजनक ! 24 तासात Corona मुळे 2000 लोकांचा मृत्यू, जगभरात 75 हजाराहून जास्त ‘बळी’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : कोरोना विषाणूने अमेरिकेत थैमान घातले आहे. परिणामी जगातील महासत्ता असलेली अमेरिका कोरोनापुढे असहाय्य वाटत आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकेच्या परिस्थितीबद्दल चिंता आहे पण कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यात ते अपयशी ठरत आहेत. कोरोना विषाणूमुळे मृतांचा आकडा झपाट्याने वाढत असून गेल्या 24 तासांत अमेरिकेत कोरोना विषाणूमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 2000 पर्यंत वाढली आहे.

न्यूयॉर्कमध्ये 731 लोकांचा मृत्यू

अमेरिकेतील न्यूयॉर्क मधील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून सध्या न्यूयॉर्क शहर कोरोनाचे केंद्र बनले आहे. केवळ न्यूयॉर्कमध्ये गेल्या 24 तासांत 731 लोकांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. अमेरिकेच्या एका राज्यात कोरोनामधून एकाच दिवसात झालेला ही सर्वात जास्त मृत्यूंची संख्या आहे. न्यूयॉर्कमध्ये आतापर्यंत 5489 लोकांचा मृत्यू कोरोना संसर्गामुळे झाला आहे. संपूर्ण जग या आजाराच्या विळख्यात सापडले आहे, परंतु सर्वात वाईट परिस्थिती अमेरिकेची आहे. तर संपूर्ण जगात कोरोना विषाणूमुळे 75 हजार पेक्षा अधिक लोकांचा बळी गेला आहे.

You might also like